Home » महाराष्ट्र » सापुतारा घाटात खाजगी बस कोसळून अपघात ; अपघाताची घटना व्हिडीओमध्ये कैद !

सापुतारा घाटात खाजगी बस कोसळून अपघात ; अपघाताची घटना व्हिडीओमध्ये कैद !

सापुतारा ( वास्तव पोस्ट न्यूज ) : नाशिक जिल्ह्यातील सापुतारा घाटात चालकाचे नियंत्रण सुटून बस दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त बसमध्ये ५७ प्रवाशी होते. या अपघातात दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. तसेच आठ हून अधिक प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी युद्ध पातळीवर मदत केली आणि रुग्णवाहिकाही बोलावली.

दरम्यान या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये अपघाताचे कारण समोर आले आहे. ही बस ५७ पर्यटकांना घेऊन सापुताऱ्याहून सुरतकडे जात असतांना सापुतारा घाटात खोल दरीत कोसळली. अपघाताचा हा व्हिडिओ बसमध्ये बसलेल्या एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये शूट केल्याचे दिसत आहे. उतारावर वळणाच्या ठिकाणी चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस डावीकडे न वळता सरळ संरक्षण भिंत तोडून दरीत गेल्याचे दिसत आहे. अपघातामुळे बसमधील प्रवासी आरडाओरडा करीत होते. तसेच लहान मुलांचा रडतांनाचा आवाजही ह्या विडिओमध्ये ऐकू येत आहे.

अपघातात ही बस दरीत एका झाडाला अडकल्याने सुदैवाने मोठी जीवीत हानी टळली. मात्र या अपघातात दोन बालकं ठार झाली असून आठ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. सुरत येथील बापा सीताराम ट्रॅव्हल्सची ही लक्झरी बस आहे. सर्व जखमींवर सुरत येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!