Home » जळगाव » जळगाव पोलीस भरती : लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर

जळगाव पोलीस भरती : लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी जाहीर

जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राज्यात पोलीस दलात विवीध संवर्गातील पोलीस शिपाई पदाकरीता पोलीस भरती प्रक्रिया सुरु आहे. त्यात जळगाव जिल्हा पोलीस घटकात एकूण १३७ पोलीस शिपाई पदाकरीता शाररिक व मैदानी चाचणी प्रक्रिया पुर्ण झालेली आहे. त्याअनुषंगाने पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षे करीता पात्र उमेदवारांची यादी जळगाव जिल्हा पोलीस दलाचे वेबसाईट https://jalgaonpolice.gov.in वर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. तसेच सर्व पात्र उमेदवारांना लेखी परिक्षेबाबत कळविण्यात आलेले आहे.

जळगाव पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षा दिनांक ०७/०७/२०२४ रविवार रोजी सकाळी ०९:०० ते १०:३० वाजेदरम्यान जळगाव शहरातील मुळजी जेठा महाविदयालय (M.J. कॉलेज) जळगाव येथे होणार आहे. जळगाव पोलीस शिपाई भरती २०२२-२३ लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांनी दिनांक ०७/०७/२०२४ रोजी सकाळी ०८:०० वाजता लेखी परिक्षेकरीता उपस्थित रहावे. लेखी परिक्षा करीता लेखन साहित्य परिक्षा केंद्रावर उपलब्ध करुन देण्यात येणार असुन उमेदवारांनी मोबाईल तथा कोणतेही इलेक्ट्रॉनिक डिवाईस व इतर साहित्य सोबत आणू नये. उमेदवारांनी फक्त महाआयटीकडील लेखी परिक्षा प्रवेश पत्त्रासह, स्वतःचे आधारकार्ड व जळगाव पोलीस घटकाचे ओळखपत्र सोबत आणावे, असे पोलीस अधीक्षक जळगाव यांनी कळविलेले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!