Home » महाराष्ट्र » मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सहकाऱ्यांच्या साथीने घेतला ‘मिलेट भोजनाचा आस्वाद’

मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार सहकाऱ्यांच्या साथीने घेतला ‘मिलेट भोजनाचा आस्वाद’

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन दरम्यान आज विधान भवनातील कँटीनमध्ये खास ”मिलेट महोत्सव – २०२४” चे आयोजन करण्यात आले होते. विधिमंडळातील सर्व आमदारांसाठी मिलेट म्हणजे कडधान्य, भरडधान्य यापासून बनलेले जेवणही ठेवण्यात आले होते. सर्व आमदार सहकाऱ्यांच्या साथीने या भोजनाचा आस्वाद घेतला.

यावेळी कृषी मंत्री धनंजय मुंडे, मंत्री संजय राठोड, मंत्री दादाजी भुसे, राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार श्रीरंग बारणे, आमदार आशिष जयस्वाल, आमदार संतोष बांगर, आमदार गोपीचंद पडळकर तसेच विधिमंडळातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!