Jadeja announces retirement from T20 : भारतीय क्रिकेट वर्तुळातून या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. विराट कोहली, कॅप्टन रोहित शर्मा याच्यानंतर आता टीम इंडियाच्या तिसऱ्या खेळाडूने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली आहे.
वास्तव पोस्ट न्यूज | टीम इंडियाने रोहित शर्माच्या नेतृत्वात पहिल्यांदा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाच्या या अविस्मरणीय विजयानंतर विराट कोहली आणि त्याच्या पाठोपाठ कॅप्टन रोहित शर्मा याने निवृत्त होत असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता टीम इंडियाचा ऑलराउंडर रवींद्र जडेजा यानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. रवींद्र जडेजाने सोशल मीडिया पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.
https://www.instagram.com/p/C81oDZyOUV1/?utm_source=ig_web_button_share_sheet
रवींद्र जडेजाने २००९मध्ये श्रीलंकेविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. जडेजाने एकूण ७४ टी-20सामन्यांमध्ये टीम इंडियाचे प्रतिनिधित्व केले. जडेजाने या ७४ सामन्यांमधील ४१ डावात ५१५ धावा आणि ५४ विकेट्स त्याच्या नावे आहेत. जडेजाची १५ धावात ३ विकेट्स ही सर्वोत्तम कामगिरी ठरली.
रवींद्र जडेजाने इंस्टाग्रामवर टी 20 वर्ल्ड कप ट्रॉफीसह फोटो पोस्ट केला असुन जडेजाने या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मनपूर्वक आभार, मी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करतोय. मी नेहमीच अभिमानाने धावणाऱ्या घोड्याप्रमाणे देशासाठी १०० टक्के देत राहील. तसेच मी इतर फॉर्मेटमध्ये खेळत राहणार आहे. टी-20 वर्ल्ड कप जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. अविस्मरणीय आठवणी, उत्साह आणि बिनशर्थ पाठिंब्यासाठी आपल्या सर्वांचे आभार. जय हिंद”, असं जडेजाने इंस्टा पोस्टमध्ये म्हटले आहे.
