Headlines
Home » महाराष्ट्र » पुणे हिट अँड रन : मृतकांच्या पालकांना दहा लाखांचा धनादेश सुपूर्द

पुणे हिट अँड रन : मृतकांच्या पालकांना दहा लाखांचा धनादेश सुपूर्द

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुणे शहरातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना राज्य शासनाकडून विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश आज त्यांना सुपूर्द करण्यात आला.

या प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला कोर्टाने जामीन मंजूर केला असला तरीही या प्रकरणातील सर्व दोषींवर कठोर कारवाई करू असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मृतक तरुण आणि तरुणीच्या पालकांना दिले.

यावेळी मंत्री संजय राठोड, मुख्य सचिव डॉ. नितीन करीर, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच पुणे युवासेना सचिव किरण साळी आणि पीडित कुटूंबातील अन्य सदस्य उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!