जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : राधाकृष्ण नगर जळगाव येथे रहिवाशांनी आज मोठ्या उत्साहाने वृक्षारोपण केले. यात तरुण मुले, महिला, पुरुष, जेष्ठ नागरीक, अबालवृद्ध सर्वच जण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी जेष्ठांनी झाडांचे महत्व सांगितले तसेच वृक्षारोपणाबाबत अनेकांनी मार्गदर्शन केले. या उपक्रमात नगरसेवक आणि समाजसेवक दिलीप पोकळे, मोतीलाल चौधरी, संगीता पाटील, डी.पी.पवार, संदीप वाणी, नेरकर, राजेंद्र पाटील, नरेंद्र पाटील आदी नागरिक उपस्थित होते. अनेक नागरिकांनी ट्री गार्ड खरेदी करण्यासाठी आर्थिक मदत केली आहे. असाच उपक्रम पुढील चार रविवार राबविण्यात येणार आहे.

या उपक्रमासाठी मोतीलाल चौधरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्यांनी आपल्या व्हाट्सअप आणि टेलीग्राम या सोशल मिडिया अकाउंटच्या माध्यमातून नागरिकांना झाडांचे महत्व पटवून दिले. सतत मेसेजच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्यांनी जनजागृतीचे कार्य सुरुच ठेवले. त्यातूनच वृक्षारोपण करायची संकल्पना समोर आली.

त्यासाठी मोतीलाल चौधरी यांनी एका वृक्षासाठी लागणारा सर्वसाधारण खर्च नागरिकांसमोर मांडला. हळूहळू त्यांना अनेक लोकांची साथ मिळाली आणि प्रत्येकाने आपआपल्या परिने शक्य तेवढी आर्थिक मदत करून वृक्षारोपण व संवर्धन म्हणजेच “झाडे लावा आणि झाडे जगवा” या अभियानास सुरवात केली. आज रोजी राधाकृष्ण नगर येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जवळजवळ शंभर झाडे लावण्याचे लक्ष्य असल्याचे नागरिकांनी सांगितले.
मोतीलाल चौधरी हे महानगरपालिका जळगाव वाघुर प्रकल्प विभागात कार्यरत असुन सामाजसेवेच्या माध्यमातून ते सतत अनेक उपक्रम राबवित असतात. त्यांच्या या वृक्षारोपण उपक्रमाचे जनमानसातुन कौतुक होत आहे.

आपले अनमोल सहकार्य आपण आमची .वृक्षारोपण उपक्रमाची बातमी पोस्ट केली धन्यवाद.