Headlines
Home » राजकीय » विधान परिषद निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट न्यायालयात जाणार !

विधान परिषद निवडणुकीच्या स्थगितीसाठी ठाकरे गट न्यायालयात जाणार !

Legislative Council Election: आमदार अपात्रतेचा निकाल न्यायालयात प्रलंबित असतांना विधान परिषदेची निवडणुक घेणे हे घटनाबाह्य असुन निवडणुक पुढे ढकला अशी मागणी ठाकरे गटाने केली असुन लवकरच सर्वोच्च न्यायालयात पुन्हा दाद मागणार आहेत.

मुंबई ( वास्तव पोस्ट न्यूज ) : विधान परिषदेतील ११ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम मंगळवारी जाहीर झाला असतानाच विधान परिषदेच्या १२ जुलै रोजी ११ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती आणण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. २५ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून १२ जुलै रोजी मतदान व त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी होईल.

दरम्यान या निवडणुकीआधीच शिवसेना उद्धव ठाकरे गटाने सर्वांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला आहे. आमदार अपात्रता प्रकरणासंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असतानाही विधान परिषद निवडणूक घेणे हे घटनाबाह्य असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेसंदर्भात खटल्याचा अंतिम निकाल अद्याप लागला नसल्याने आमदारांवर अपात्रेची टांगती तलवार आहे. त्यामुळे या आमदारांनी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान करणे हे घटनाबाह्य आहे. याचबरोबर, पक्ष फुटल्यानंतर काही आमदारांची प्रतिज्ञापत्रे जी सर्वोच्च न्यायालयात आहेत. त्यामध्ये ते शिवसेना ठाकरे गटात असल्याची ग्वाही दिल्यानंतरही ते शिंदेंच्या शिवसेनेत गेले आहेत. त्यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाचा अधिकार कसा देणार? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाकडून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात ठाकरे गटाकडून आज कायदेतज्ज्ञांची बैठक घेण्यात येणार असून या निवडणुकीच्या स्थागितीसाठी कोर्टात जाण्याची तयारी ठाकरे गटाकडून केली जात आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!