भुसावळ ( वास्तव पोस्ट न्यूज ) : भुसावळ तालुक्यातील किन्ही येथे जि.प.शाळेत ‘शाळापूर्व तयारी मेळावा व प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शालेय स्तरावर नवीन शैक्षणिक वर्ष २०२४-२५ आजपासून सुरु झाले. उन्हाळी सुटी संपून आज शाळा पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनी गजबजल्या. नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात होत असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थ्यांच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती.
किन्ही येथील जिल्हा परिषद शाळेत ‘शाळापूर्व तयारी मेळावा व प्रवेशोत्सव’ प्रसंगी प्रशिक्षणार्थी सहाय्यक जिल्हाधिकारी वेवोतोलू केझो यांनी शाळेस भेट दिली. त्यांनी शाळापूर्व तयारी मेळाव्यातील सात स्टॉल्स बाबत माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियाना अंतर्गत दिले जाणारे मोफत शालेय पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले, तसेच विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, शिक्षण विस्तार अधिकारी बळीराम धाडी, शिक्षक वृंद, सरपंच नीलम सोनवणे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद तायडे यांच्यासह अनेक पालक उपस्थित होते.
