Home » राष्ट्रीय » ‘एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

‘एनडीए सरकार कधीही कोसळू शकतं : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकावून टीका केली आहे. खडगे म्हणाले की, एनडीए सरकार हे चुकून स्थापन झाले असून पुढील काळात हे सरकार कधीही कोसळू शकते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमताचा २७२ हा आकडा गाठता आला नाही. २४० जागांवर विजय मिळविला. सत्ता स्थापनेसाठी त्यांना एनडीएतील मित्रपक्षांवर अवलंबून राहावे लागले. एनडीएचे सरकार अल्पमतात आहे. त्यामुळे हे सरकार कधीही पडू शकते. आम्हाला तर वाटते सरकार पाच वर्ष चालावे, देश चांगल्या पद्धतीने चालला पाहीजे. देश बळकट करण्यासाठी आम्ही सर्व एकत्र येऊन काम करू. पण आमच्या पंतप्रधानांची सवय आहे की, जी गोष्ट व्यवस्थित सुरू आहे, ती त्यांच्या पचनी पडत नाही. आमच्या बाजूने आम्ही देशासाठी काम करत राहू.”

बिहारमधील जेडीयू पक्षाने खडगेंच्या या आरोपाला उत्तर दिले आहे. खरगे जो आरोप करत आहेत, त्यावर त्यांनी आधी स्वतःकडे बघावे, असेही सूचित केले. बिहारचे विद्यमान विधानपरिषदेचे आमदार नीरज कुमार यांनी खरगेंच्या विधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. खरगे यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंहराव आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळातील कामगिरीकडे आधी पाहावे, असा पलटवार नीरज कुमार यांनी केला. जेव्हा कोणत्याही पक्षाला बहुमत नव्हते, तेव्हा निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या पीव्ही नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखाली अल्पमताचे सरकार स्थापन करुन काँग्रेसने ते सरकार तडीस नेलेच होते. पी.व्ही. नरसिंहराव यांनी दोन वर्षांत छोट्या पक्षांमध्ये फूट पाडून काँग्रेस सरकारला बहुमतात आणले. खरगे यांना काँग्रेसचा हा इतिहास माहीत नाही का? असा सवालही उपस्थित केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!