Home » महाराष्ट्र » पुणे हिट अँड रन प्रकरणात माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा

पुणे हिट अँड रन प्रकरणात माजी गृहमंत्र्यांचा खळबळजनक दावा

Pune hit and run case : पुण्यातील कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणात आरोपींना वाचविण्यासाठी आता मृतकांच्या व्हीसेरात छेडछाड करण्यात येत असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

पुणे ( वास्तव पोस्ट न्यूज ) : पुणे हिट अँड रन प्रकरणात पुण्यातील धनाढ्याच्या अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने कार चालवून दोघांचा जीव घेतला होता. या प्रकरणात अल्पवयीन आरोपीला वाचविण्यासाठी पोलिसांसह सर्वच यंत्रणा कामाला लागल्या होत्या. मात्र देशभरातून संतापाची लाट उसळल्यानंतर यंत्रणांची पोलखोल होतं गेली. या प्रकरणात दररोज नवनवीन धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दाव्याने तर आणखीनच खळबळ उडाली आहे. देशमुख यांनी थेट राज्य सरकार आणि यंत्रणेवर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणात अल्पवयीन मुलगा आणि इतर आरोपींना वाचविण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी मोठा कट रचण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला.

◆ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे गंभीर आरोप :
पुण्यामधील कल्याणीनगर येथे हिट ॲंड रन प्रकरणात विशाल अग्रवाल याच्या अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलण्यात आले. यात राज्य सरकराचा हात असल्याचा आरोप माजी गृहमंत्र्यांनी केला. रक्ताचे नमुने बदलण्यात आल्याचे समोर आल्यानंतर डॉक्टरांसह याप्रकरणात काही जणांवर कारवाई करण्यात आली आहे. तर निलंबित अधिकाऱ्यानेच हा प्रकार केल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रकारात राज्य सरकारचाच वरदहस्त असल्याचा आरोप अनिल देशमुखांनी केला आहे.

◆ मृतकांनाच दोषी ठरविण्याचा रचण्यात येत आहे कट :
एक माजी माझी गृहमंत्री म्हणून माझी अशी माहिती आहे की, मृत आरोपीला वाचविण्यासाठी यंत्रणा अजूनही काम करत असुन आता मृतकांचा व्हीसेरा रिपोर्ट अल्कोहोल पॉझिटिव्ह आहे हे दाखविण्याचा प्रयत्न सुरु आहे. मृतक हे दारु पिऊन वाहन चालवत होते, असं न्यायालयात दाखवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोप तदेशमुख यांनी केला आहे. असं झालं तर आरोपी सुटून जाईल आणि मृतक आरोपी ठरतील यासाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव असल्याचा आरोप त्यांनी केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!