POLICE TRANSFERS BY PROMOTION : पदोन्नती झालेल्या पोलीस निरीक्षकांचे महासंचालक रश्मी शुक्ला यांनी अभिनंदन केले आहे. नाशिक शहर आयुक्तालयात एक, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीवर एक, तर नाशिक शहर व ग्रामीणमधून ९ अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीने बदल्या झाल्या आहेत. तसेच, महाराष्ट्र पोलीस अकादमीमध्ये तिघे रूजू होणार आहेत.
जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र पोलिस दलातील सहायक पोलीस निरीक्षक गेल्या काही वर्षांपासून पदोन्नतीच्या प्रतिक्षेत होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पदोन्नतीने बदल्या केल्याने अधिकाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
दरम्यान बदनापूर, जिल्हा जालना येथील पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश पवार यांना पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती मिळाली आहे.
जगदीश पवार यांना नाशिक विभागात पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती देण्यात आली आहे. त्यांनी मागील दोन वर्षात अनेक गुन्ह्यांचा तपास करून जवळपास सर्वच गुन्हे निकाली काढलेले आहेत.
दरम्यान, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या आदेशानुसार, अपर पोलीस महासंचालक (आस्थापना) संजीव कुमार सिंघल यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील ४४९ सहायक निरीक्षकांची पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती करतानाच बदल्यांचे आदेश जारी केले आहेत.
