Home » राष्ट्रीय » नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड ; तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार

नरेंद्र मोदी यांची संसदीय नेतेपदी निवड ; तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार

PM Swearing Ceremony : भाजपच्या नेतृत्वाखालील NDA आघाडी सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेवर येणार आहे. नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार आहेत. ९ जून, रविवार रोजी शपथविधी होणार आहे.

नवी दिल्ली ( वास्तव पोस्ट न्यूज ) : देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच सरकार स्थापन होत आहे. जुन्या संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी मिळून नरेंद्र मोदी यांची संसदीय पक्षाच्या नेतेपदी निवड केली.

राजनाथ सिंह यांनी पंतप्रधान मोदींच्या नावाचा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सर्व पक्षाच्या नेत्यांनी सहमती दर्शवली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल हॉलमध्ये उपस्थित भाजपा आणि एनडीए नेते तसेच नवनिर्वाचित खासदारांना संबोधित केलं. संबोधन संपल्यानंतर नरेंद्र मोदी तात्काळ राष्ट्रपती भवनात गेले. तिथे त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्यासह चिराग पासवान आणि एनडीएचे १५ पेक्षा जास्त नेते उपस्थित होते. त्यामध्ये राजनाथ सिंह, अमित शाह, चंद्रबाबू नायडू, नीतीश कुमार, एकनाथ शिंदे, प्रफुल्ल पटेल, सुदेश महतो, अनुप्रिया पटेल, एचडी कुमारस्वामी आणि चिराग पासवान होते.

भाजपाप्रणीत एनडीए (राष्ट्रीय लोकशाही आघाडी) च्या संसदीय नेतेपदी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर आता नरेंद्र मोदी यांचा शपथविधी ९ जून रविवारी संध्याकाळी ६ वाजता होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!