जळगाव ( प्रतिनिधि ) केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित समतोल प्रकल्पा तर्फे आज २४ रोजी गवळी वाडा , जळगाव या ठिकाणी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला.
मुलींचे अधिकार ,हक्क , त्यांना मिळणाऱ्या संधीचे सोन व्हावे त्यांची ताकद व क्षमता वाढावी. देशातील मुलींना भेडसावणाऱ्या सर्व असमानता बद्दल लोकांमध्ये जनजागृती व्हावी , हा हेतू डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय बालिका दिवस जोमाने साजरा करण्यात आला.
आज मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करतांना दिसत असल्या , तरी अनेक मुली वाईट गोष्टींना ही बळी पडतांना दिसून येत आहेत. आज या वाईट गोष्टी त्यांना पुढे अडथळे निर्माण करतात. आज अनेक मुलींना जन्मतः मारले जाते , आज ही घरात मुला – मुलींमध्ये भेद भाव केले जातात . समाजात मुलींना ओझे मानले जाते. आजही स्री स्री भृणहत्या थांबलेली नाही .पण हे सर्व थांबले पाहिजे . आज मुली मुलांपेक्षा काही कमी नाहीत. अनेक मुली या स्वतःच्या पायावर उभे राहून कार्य करतांना दिसून येत आहेत. प्रत्येक क्षेत्रात स्त्री शक्ती पूर्ण ध्येर्याने काम करतांना दिसून येते. मुलगी ही जीवनाची देणगी आहे , देशाचे नाव रोशन करत आहे , आज मुली मुलांपेक्षा पुढे जात आहे. ” भृण हत्या हे पाप आहे, मानव जातीसाठी शाप आहे .” समतोल प्रकल्पाचे व्यवस्थापक श्री .प्रदिप पाटील यांनी भृणहत्या बाबत विविध घटनांना उजाळा देऊन माहीती दिली . त्यांचे हे जनजागृतीचे कार्य पाहून जमलेल्या महिला, नागरिकांनी त्यांच्या कार्यास पाठिंबा देऊन पुढील कार्यास वाटचालीस शुभेच्छया दिल्यात .
यावेळी राष्ट्रीय बालिका दिना निमित्त समाजातील प्रत्येकाने मुलगा मुलगी भेद न करण्याची व समाजातील लोकांना स्री – पुरुष समानतेची जाणीव करून देण्याची शपथ घेऊन खाऊ वाटप करण्यात आला. यावेळी गवळी वाड्यातील मोठ्या संख्येत महिला वर्ग उपस्थित होता . समतोल प्रकल्पाचे टीम सदस्य विश्वजीत सपकाळे , महेंद्र चौधरी , दीपक पाचपांडे , रविना भगत यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
