Headlines
Home » सामाजिक » रक्तदान ही काळाची गरज : वैशालीताई सुर्यवंशी;युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला भेट

रक्तदान ही काळाची गरज : वैशालीताई सुर्यवंशी;युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला भेट

पाचोरा (वास्तव पोस्ट न्यूज ) : रक्तदान ही काळाची गरज असून सर्वांनी या मानवतावादी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांनी केले. त्या युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या रक्तदान शिबिराला दिलेल्या भेटीप्रसंगी बोलत होत्या.

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या वतीने शहरातील शिव मंदिर, दसरा मैदान येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम रेड प्लस सोसायटीच्या माध्यमातून आयोजीत करण्यात आला. प्रारंभी आयोजकांच्या वतीने वैशालीताई सुर्यवंशी यांचे छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर ताईंनी मनोगतातून रक्तदानाची महत्ता वर्णन करतांनाच युवा सामर्थ्य फाऊंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.

या कार्यक्रमाला फाऊंडेशनचे अध्यक्ष उमेश उर्फ बंटी हटकर, डॉ. राजेंद्र वासवाणी, शैलेश बागुल, विवेक महाजन, भरत गायकवाड, अमोल शेलार आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!