जळगाव ( वास्तव पोस्ट न्यूज ) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून मार्च २०२४ मध्ये राज्यभरात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यात जळगाव येथील मानव सेवा माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९८.२४% लागला असुन, त्यात ३० विदयार्थी विशेष प्राविण्यासह, २१ विदयार्थी प्रथम श्रेणीत तर
०५ विदयार्थी व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले.
१) प्रथम क्रमांक : वैष्णवी सुभाष धनगर ९२.६०%
२) द्वितीय क्रमांक : नयन जितेंद्र बोरसे : ९२.४०%
३) तृतीय क्रमांक : नेहा दिनेश लिंडाईत : ९०.८०%
४) चवथा क्रमांक : रुपेश अनिल पाटील- ९०.६०%
५) पाचवा क्रमांक -पवन संजय चव्हाण ८९.८०%

शालांत परीक्षेत यशस्वी झालेल्या वरील सर्व विद्यार्थ्यांचे मानव सेवा मंडळ संस्थेचे अध्यक्ष आर. एस. डाकलिया, संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, मुक्ता पाटील, शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारीवर्ग यांनी अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
