Headlines
Home » शैक्षणिक » अखेर शिक्षण मंडळाकडून अधिकृत तारखेची घोषणा; १०वी चा निकाल २७ मे रोजी लागणार

अखेर शिक्षण मंडळाकडून अधिकृत तारखेची घोषणा; १०वी चा निकाल २७ मे रोजी लागणार

पुणे (वास्तव पोस्ट न्यूज) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. जवळपास सर्वच बोर्डाचे निकाल जाहीर करण्यात आल्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल २७ मे रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, शिक्षण मंडळाकडून अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. सोमवारी २७ मे रोजी दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना मंडळाच्या वेबसाईटवरुन हा निकाल पाहता येणार आहे. नुकताच लागलेल्या बारावीच्या निकालानंतर राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून १ मार्च ते ३१ मार्च दरम्यान दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्य भरातून दहावीच्या १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. आता सोमवारी लागणाऱ्या निकालाकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष लागुन आहे.

कसा पाहाल निकाल?
दहावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल https://mahresult.nic.in या वेबसाईटवर दुपारी एक वाजल्यापासून पाहता येणार आहे. वेबसाईटवर गेल्या नंतर महाराष्ट्र SSC निकाल 2024 च्या लिंकवर क्लिक करा. तिथे रोल नंबर आणि आईचे नाव टाका आणि सबमिट करा. त्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला निकाल पाहता येणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!