नाशिक | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून अधिसूचनाद्वारे सोमवार दिनांक २० मे २०२४ रोजी सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता मतदानाच्या दिवशी लोकसभा मतदारसंघात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
दरम्यान अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. अनेक कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना मतदानासाठी सुट्टी देण्यास विरोध दर्शविला आहे, तसेच काही ठिकाणी फक्त २ तास सुट्टी देणार आहेत. बरेच कंपनीतील कामगार मतदान केंद्रापासून लांब अंतरावर कामावर असतात व मतदान केंद्रा वरती गर्दी असते. त्यामुळे कामगारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. तरी औद्योगिक वसाहती मधील सर्व व्यवस्थापनांना दि.२० मे २०२४ रोजी मतदाना करिता पूर्ण दिवसाची सुट्टी देणे बाबत वरील आदेशानुसार सूचना करावी. असे निवेदन शर्वरी पोटे, सहाय्यक कामगार आयुक्त, नाशिक यांना कॉ सिताराम ठोंबरे, कॉ देविदास आडोळे, कॉ संतोष कुलकर्णी, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. युवराज पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
