Headlines
Home » राष्ट्रीय » दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग ; अग्नीशमन दलाचे २१ वाहने तैनात

दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग ; अग्नीशमन दलाचे २१ वाहने तैनात

दिल्ली | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – राष्ट्रीय राजधानीच्या आयटीओ परिसरात असलेल्या सीआर बिल्डिंगच्या तिसऱ्या मजल्यावर आयकर कार्यालयास आग लागल्याची घटना घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या एकूण २१ गाड्या तैनात करण्यात आल्या होत्या. २०२४ लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीचे वारे घमासान वाहत असताना व दुसरीकडे भाजप सरकारच्या आयटी, ईडी, सीबीआय़वर देशभऱातील विरोधक आरोप करीत असतानाच ही धक्कादायक बातमी समोर आली आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवलं. या घटनेत एका ४२वर्षीय व्यक्तीचा धुरामुळे गुदमरुन मृत्यु झाल्याचे समजते. खबरदारीचा उपाय म्हणून इमारत तातडीने रिकामी करण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली. या आगीत अनेक फाईल्स जळून खाक झाल्या.

आगीचे स्वरूप उग्र असून ही आग विझविण्यासाठी अग्मीशमन दलाचे जवानांकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. २१ अग्नीशमन दलाच्या वाहनांद्वारे ही आग विझवली जात आहे. दिल्ली पोलिस मुख्यालयाच्या मागच्या बाजूला आयकर विभागाची ही इमारत असून दुपारी तीन वाजता आयटीओ येथील आयकर विभागाच्या कार्यालयात आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानही तातडीने तेथे पोचले. दरम्यान ही आग कशामुळे लागली ही माहिती मात्र मिळू शकलेली नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!