Headlines
Home » क्रीडा » युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाशला सुवर्ण पदक

युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाशला सुवर्ण पदक

पुणे | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – कझाकिस्तानमध्ये अस्तानात २२ वर्षांखालील युवा आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत पुण्याच्या आकाश गोरखाने सुवर्णपदक पटकावले. या मुष्टियुद्ध स्पर्धेत २२ वर्षांखालील गटामध्ये वर्चस्व राखत २१ पदकांसह एकूण ४३ पदकांची कमाई केली.

पुण्याच्या आकाशने ६० किलो गटाच्या अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या रस्लन कुझेउबाएवचा ४-१ असा पराभव करून विजेतेपद जिंकले. मागील वर्षी गोवा येथे राष्ट्रीय स्पर्धेत आकाशने रौप्यपदक मिळविले होते. त्यानंतर आंतरसेनादल राष्ट्रीय स्पर्धेत त्याला सुवर्णपदक मिळाले.

सेनादलाचेच प्रतिनिधित्व करणाऱ्या आकाश गोरखाने लष्करी क्रीडा संस्थेत सराव करताना जयसिंग पाटील यांनी आकाश गोरखाला प्रशिक्षण दिले. या संस्थेतील मुष्टीयुद्धचे प्रमुख लेफ्टनंट कर्नल अनुपम कुमार आणि संस्थेचे कमांडंट कर्नल देवराज गिल यांचेही त्याला प्रोत्साहन मिळाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!