Home » राजकीय » म्हसावद येथे महाविकास आघाडीकडून मशाल रॅली

म्हसावद येथे महाविकास आघाडीकडून मशाल रॅली

जळगाव | दि.९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – तालुक्यातील म्हसावद येथे जळगाव लोकसभा मतदार संघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच महाविकास आघाडीच्या घटक पक्षांकडून भव्य मशाल रॅली काढण्यात आली.

सविस्तर वृत्त असे की २०२४ लोकसभा सार्वत्रीक निवडणुक जळगाव मतदार संघाचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असुन जळगाव लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार करण बाळासाहेब पाटील यांच्या प्रचारार्थ घोषणा देत म्हसावद गावात मशाल रॅली काढण्यात आली.

रॅली दरम्यान मशाल या चिन्हापुढील बटन दाबुन करण पाटील यांनाच प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले. या रॅलीत इंदिरा नगर मधील तरुण मंडळी, ग्रामपंचायत सदस्य, तसेच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!