Home » राष्ट्रीय » मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या घरी ईडीची छापेमारी ;३० कोटीचे घबाड जप्त !

मंत्र्याच्या स्वीय सचिवाच्या घरी ईडीची छापेमारी ;३० कोटीचे घबाड जप्त !

रांची | दि.६ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या उद्या होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या आधीच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडची राजधानी रांचीमध्ये अनके ठिकाणी छापेमारी केली आहे. या छापेमारीत मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. ग्रामीण विकास मंत्री आलमगीर आलम यांचे स्वीय सचिव संजीव लाल यांच्या नोकराच्या घरातून ईडीने मोठी रोकड जप्त केलीय. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही रोकड तब्बल २० ते ३० कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचा अंदाज आहे. या छापेमारीमुळे राजकारण्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

झारखंड ग्रामीण विकास विभागाचे मुख्य अभियंता वीरेंद्र के यांच्यावर ED ने फेब्रुवारी २०२३ मध्ये काही योजनांच्या अंमलबजावणीतील कथित अनियमिततेशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल केला असून हा काळ्या पैशाचा भाग असल्याचे ईडीचे मत असुन रामला अटक करण्यात आली.

कोण आहेत हे आलमगीर आलम :
आलमगीर आलम हे पाकूर विधानसभेतून चार वेळा काँग्रेसचे आमदार राहिले आहेत आणि सध्या ते राज्य सरकारमध्ये संसदीय कामकाज आणि ग्रामीण विकास मंत्री आहेत. याआधी आलमगीर आलम २० ऑक्टोबर २००६ ते १२ डिसेंबर २००९ पर्यंत झारखंड विधानसभेचे अध्यक्ष होते. राजकारणाचा वारसा घेत आलमगीर यांनी सरपंचपदाची निवडणूक जिंकून राजकारणात प्रवेश केला. २००० मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले आणि तेव्हापासून ते ४ वेळा आमदार झाले.

सचिवाच्या नोकराच्या घरी करोडो रूपयांचे घबाड :
एका १०हजार रुपयांच्या लाच प्रकरणाचा तपास ईडी कडून सुरु असतांना तपासा दरम्यान ईडीला असा काही सुगावा लागला की, तो थेट मंत्र्याशी जोडला गेला. आलमगीर आलम यांच्या मंत्रालयात भ्रष्टाचार सुरू असून हा पैसा नोकरांच्या घरी जात असल्याची गुप्त माहिती ईडीला मिळाली होती. यानंतर ईडीने आलमगीरच्या पर्सनल सेक्रेटरीच्या नोकराच्या घरावर छापा टाकला. या छापेमारीत इतकी मोठी रोकड पाहून अधिकारी देखील आश्चर्यचकीत झाले. या मुद्द्यावरून आता भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे की, काँग्रेसवर ‘मोजणी होऊ द्या, ही संख्या ५० कोटींवर पोहोचेल. संपूर्ण झारखंड सरकार भ्रष्टाचारात बुडलंय” असा हल्लाबोल त्यांनी कॉंग्रेसवर केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!