जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – निवडणुका ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या संलग्न संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जळगाव जिल्हाधिकारी यांना “ईव्हीएम विरोधात” निवेदन दिले.
सदर निवेदनात म्हटले आहे की, प्रत्येक निवडणुकीत मतदार हा मतपत्रिकेनेच मताधिकार बजावेल हा कायदा भारतीय संसदेने लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५९ नियम ५९ मध्ये नमुद केला आहे. १९८९ संशोधित नियम ६१क या नियमाचा वास्तविक अर्थ असा आहे की ईव्हीएमचा वापर अपवादात्मक परिस्थितीत किंवा विशेष परिस्थिती लक्षात घेऊन करावयाचा आहे. परंतु निवडणुक आयोग संसदेने बनवलेल्या नियम ५९ व ६१क च्या विरोधात काम करीत आहे.


निवडणुक आयोग १८व्या लोकसभेच्या निवडणुकांत ईव्हीएमचा वापर करणार आहे. परंतु हे कायदे संमत नसुन ते संविधानाच्या कलम ३२४ मधील उद्देशाच्या विपरित आहे. संविधानाच्या कलम ५ कलम ३२६ व कलम १९ अंतर्गत नागरिकांचे मुलभुत अधिकारांची रक्षण करण्याची जबाबदारी संविधानाने कलम ३७५ अन्वये भारतीय निवडणूक आयोगाला दिलेली आहे. परंतु निवडणुक आयोग ईव्हीएम आमच्यावर थोपवत आहे. ईव्हीएम ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी महामहीम राष्ट्रपतींना निवेदन पोहचवावे यासाठी मा. जिल्हाधिकारी, जळगाव यांना निवेदन देण्यात आले.
भारत मुक्ती मोर्चाचे निवेदन मोहन शिंदे, नितीन गाढे, देवा निकम, विजु सुरवाडे, अमजद रंगरेज, कल्पना म्हस्के, अनिता पेंढारकर, अशोक सपकाळे यांनी दिले.
बहुजन क्रांती मोर्चाचे निवेदन सुमित्र अहिरे, राजु खरे, डॉ.शाकीर शेख व रविंद्र गायकवाड यांनी दिले.
यावेळी मनोज वानखेडे साहेब, खुमान बारेला, आर.बी.परदेशी, सुनिल देहडे, बबलु पेंढारकर, राहुल सोनवणे, सारिपुत्त गाढे, गोपाळ कोळी, खुशाल सोनवणे, पंकज तायडे, मुकेश खैरे, योगेश पाटील, संजीव सोनवणे, राष्ट्रपाल सुरडकर, राणी म्हस्के, आनंदा निकम, विमल खेडकर, शामराव सुरवाडे, मधुभाऊ जोहरे, आदित्य देहडे आदी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
