Home » महाराष्ट्र » आमिर खान झाला डीपफेक व्हिडिओचा शिकार; आमिरने केली FIR दाखल

आमिर खान झाला डीपफेक व्हिडिओचा शिकार; आमिरने केली FIR दाखल

मुंबई | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे जोराने वाहत आहेतच. कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहे. मात्र इकडे सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणामुळे बॉलीवुडमध्ये भितीचे वातावरण आहे. अशातच आता दुसऱ्या एका खान मागे संकट उभे राहीले आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या गोष्टींकरीता होत असला तरी काही लोकं त्याचा वापर वाईट गोष्टींसाठी देखील करतात. एका तंत्राद्वारे आमिर खान हा डीप व्हिडिओचा शिकार झाला आहे. राजकीय पक्षाचा प्रचार करण्यासाठी आमिर खानचा एक जूना व्हिडिओ चुकीच्या पद्धतीने वापरण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

सोशल मीडिया एक्स हॅण्डलवर हा व्हिडिओ बऱ्याच वेळापासून व्हायरल होतो आहे. त्यात अभिनेता आमिर खान दिसत असुन या व्हिडिओतील आवाज देखील आमिरचा असल्याचे भासत आहे. जो की डब करण्यात आला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आमिर खान याने याप्रकरणी ॲक्शन घेत पोलिसांची मदत घेतली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ डीपफेक असल्याचे सांगून याप्रकरणी आमिर खान याने पोलीस स्टेशनमध्ये FIR नोंदवली आहे. सोबतच म्हटलं आहे की, ‘माझ्या ३५ वर्षांच्या कारकिर्दीत मी कोणत्याही राजकीय पक्षाचा प्रचार केलेला नाही, हा व्हिडिओ पूर्णपणे फेक असून यावर लोकांनी विश्वास ठेवू नये असे त्याने आवाहन केले आहे’.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!