Headlines
Home » जळगाव » जळगाव MIDC त केमिकल कंपनीला भीषण आग; आगीत २० कामगार जखमी

जळगाव MIDC त केमिकल कंपनीला भीषण आग; आगीत २० कामगार जखमी

जळगाव | दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज )– येथील एमआयडीसीमधील सेक्टर- D मध्ये असलेल्या मोरया या केमिकल कंपनीला आज सकाळी ९ वाजता भीषण आग लागली. कंपनीत सकाळ शिप्ट मध्ये काम करणारे २० पेक्षा अधिक कामगार या आगीत भाजले गेले आहेत. पैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. आगीतल्या काही गंभीर जखमींना तातडीने खाजगी रुग्णालयात तर काहींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान ही आग केमिकल कंपनीत असलेल्या बॉयलरच्या स्पोटामुळे लागल्याचे समजते. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर औद्योगिक वसाहत मधील अग्निशमन बंब, महापालिकेचा अग्निशमन बंब, जैन हिल्स येथील अग्निशमन बंब घटनांसाठी दाखल झाले. तसेच खाजगी व शासकीय रुग्णवाहिकाही घटनास्थळी तातडीने दाखल झाल्या. जखमी व भाजलेल्या कामगारांना प्राथमिक उपचारासाठी जवळच असलेल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी झालेल्यांमध्ये चार ते पाच कामगारांची प्रकृती गंभीर असुन हा आकडा वाढविण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!