Headlines
Home » सामाजिक » जळगावात महिलांच्या भव्य दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

जळगावात महिलांच्या भव्य दुचाकी रॅलीने वेधले लक्ष

जळगाव | दि. १३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सप्ताह सोहळ्याची मोटारसायकल रॅलीने सुरवात करण्यात आली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती तर्फे आज समितीचे अध्यक्ष संदीप भाऊ शिरसाठ व उप उप अध्यक्षा भारती रंधे यांच्या नेतृत्वात आज महिला रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रामुख्याने महिला रॅलीसाठी शहरातील विविध क्षेत्रातील महिलांची उपस्थिती लाभली. आंबेडकर नगर, सिद्धार्थ नगर, अजिंठा सोसायटी, तांबपुरा, शिवाजी नगर, शाम नगर, वाघ नगर तसेच सर्व धर्मसमभाव समितीच्या पदाधिकारी व भुसावळ व मुक्ताईनगर येथील भीमउत्सव समितीच्या महिला पदाधिकारी उपस्थित होते. सदर रॅली साठी मुकुल सपकाळे, सतीश गायकवाड, विजय सुरवाडे, आशिष सपकाळे, गणेश पगारे समितीचे सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!