Headlines
Home » राजकीय » बारा बलुतेदार समाजाच्या बैठकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार ; स्मिता वाघ यांना निवडून आणण्याचे आवाहन

बारा बलुतेदार समाजाच्या बैठकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार ; स्मिता वाघ यांना निवडून आणण्याचे आवाहन

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – भारतीय जनता पार्टीच्या जळगाव येथिल जिल्हा कार्यालयाकडून बारा बलुतेदार समाजाच्या पदाधिकारी यांना लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी व स्मिता वाघ यांना मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात आले. यासाठी बारा बलुतेदार समाजाची मिटिंग बोलवण्यात आली होती. सदर मिटींगला मार्गदर्शन करण्यासाठी, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांचे समवेत जिल्हा अध्यक्षा उज्वला बेंडाळे, राधेश्याम चौधरी (लोकसभा निवडणूक प्रमुख), आमदार राजू मामा भोळे, केतकी पाटील, अजय भोळे, उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख मुकुंद मेटकर, बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष किशोर सूर्यवंशी, महिला जिल्हा अध्यक्षा भारती कुमावत, कार्याध्यक्ष पृथ्वीराज सोनवणे, उपाध्यक्ष सखाराम मोरे, महानगर जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर कापडे, महानगरप्रमुख छाया कोरडे, उपाध्यक्षा अलका सोनवणे, संजय न्हावकर त्याचप्रमाणे शिंपी समाज अध्यक्ष राजेंद्र कुमार सोनवणे, सुवर्णकार समाज अध्यक्ष, भोई समाज अध्यक्ष, नाभिक समाज अध्यक्ष, सुतार, लोहार, तेली, समाज अध्यक्ष, कुंभार समाज अध्यक्ष, व बारा बलुतेदार समाजाचे अनेक प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते सुमारे ११० प्रतिनिधी या मिटींगला उपस्थित होते.

सदर मिटिंगमध्ये सर्व समाज प्रतिनिधींचे म्हणणे विजय चौधरी यांनी समजून घेतले.

उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख मुकूंद मेटकर यांनी बारा बलुतेदारांच्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष दळे यांचे मार्गदर्शनानुसार खालील विषय मांडले -विद्यमान लोकसभेत एकाही बाराबलुतेदार समाजाच्या प्रतिनिधीला उमेदवारी दिली नाही याचे शल्य मनाला वाटत असून भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने या पुढील होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बारा बलुतेदार समाजाला (संघटना सांगेल त्या प्रतिनिधीला) महासंघासाठी किमान दहा जागा निवडणुकीमध्ये सोडाव्यात, त्याचप्रमाणे विधान परिषदेवर रिक्त असलेल्या बारा जागांमध्ये किमान दोन सदस्य बारा बलुतेदार समाजाचे घेण्यात यावे (महासंघ देईल ती नावे). विश्वकर्मा योजनेमध्ये अनेक अडचणी बारा बलुतेदार समाजाला येत आहेत त्या योजनेत आर्थिक निकष व त्याची प्रक्रिया ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ प्रमाणे ठेवण्यात निश्चित करण्यात यावी. आज मितीला या योजनेचा काहीच लाभ बाराबलुतेदार या घटकाला होत नाही. एकही कर्ज वाटप करण्यात आलेले नाही, निकष पुर्ण करत दमछाक होणार आहे.

जिल्हा अध्यक्ष किशोर सूर्यवंशी यांनी आपले मत व्यक्त करताना जळगाव शहर महानगर पालिका निवडणुकीत बारा बलुतेदार समाजाला समाधानकारक प्रतिनिधित्व मिळावे हा विषय आवर्जून मांडला. चंद्रशेखर कापडे महानगर अध्यक्ष यांनी आपली भूमिका विशद करताना कुंभार समाजाला पारंपरिक विट भट्टी व्यवसाय करताना केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या जाचक अटी व नियम हा वीटभट्टी व्यवसाय संपवण्यासाठी आहे असे मत प्रवाह तयार झाला आहे हे नियम केंद्र सरकारच्या अधिकारात असल्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे मंत्री नेते गिरीश महाजन यांनी आमच्या समाजाच्या शीर्षस्थ प्रतिनिधींची एक बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावावा ही मागणी केली.

शिंपी समाजाच्या वतीने विवेक जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना आपल्या पक्षात तीस-तीस वर्षापासून कार्य करत असलेल्या आमच्या समाजाच्या कार्यकर्त्यांचा योग्य तो सन्मान व्हावा अशी मागणी केली. मनोज भंडारकर यांनी जुन्याच मागणीचा पुनरुचार करत “संत नामदेव महाराज जयंती” ही शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी अशा आशयाची मागणी, निवेदन आमदार राजू भोळे यांचे नेतृत्वाखाली व प्रदेश स्तरावरील नेते ढवळे यांच्या समवेत देवेंद्र फडणवीस तत्कालीन विरोधी पक्षनेते यांना दिले असता त्यांनी सभागृहात जोरदार आवाज उठवून हा विषय मार्गी लावलाच पाहिजे असे ठामपणे सांगितले. आज पुन्हा त्या विषयाची आठवण व्हावी म्हणून या मिटिंगमध्ये स्मरण करून देत आहे कृपया “राष्ट्रसंत शिरोमणी नामदेव महाराज “यांची जयंती शासकीय स्तरावर साजरी करण्याबाबत असलेले आपल्या सरकारमध्ये निश्चित निर्णय व्हावा ही विनंती केली.

भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विजय चौधरी यांनी आपल्या मनोगत सांगताना मी देखील बारा बलुतेदार समाजाचा घटक आहे. आपण मांडलेल्या विषयाशी मी सहमत आहे. राजकारणात निश्चितपणे डोकी मोजली जात असल्याने आपल्या लहान समाजावर सतत अन्याय होत असतो. हे सर्वच पक्षांच्या सरकारांमध्ये होत असते. परंतु मी याविषयी आपल्या भावनांशी सहमत आहे. आपण निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीनंतर लगेचच्या कालखंडात एक महाराष्ट्र स्तरावरील मिटिंग घेऊन व त्यामध्ये या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा कसोशीने प्रयत्न करीन. असे आश्वासित मी आपणास करीत आहे. आज मी आपणास आजच्या काळाची गरज म्हणून माननीय मोदीजी केंद्र सरकारमध्ये तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले पाहिजे व आपल्या जिल्ह्यातील दोन्ही खासदार प्रचंड मताधिक्याने निवडून आले पाहिजे यासाठी आपण सर्वांनी अथक प्रयत्न करणे गरजेचे आहे. आपले सरकार आल्यानंतर समस्या सोडविण्याचा मार्ग खुला होईल आपण एक दिलाने भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन करतो. पुन्हा आपल्या मागण्यांचा पूर्ण आढावा मी घेतलेला आहे, त्यावर निश्चित विचार विनिमय करण्यात येईल.

सदर बैठकीस ईश्वर मोरे, राहुल वाघ, राजु सोनवणे, किरण पतोंडेकर, भास्करराव जूनागडे, किशोर भावसार, पूनम खैरनार, ज्योती देवरे, मालती जुनागडे, अनिल खैरनार, दिलीप सोनवणे, जितेंद्र सोनवणे, अशोक शिंपी, शामकांत निकुंभ, बंटी नेरपागरे, राजकुमार गवळी, राकेश वाघ, रवींद्र बोरनारे, विनोद कुमावत, शंकर कुमावत, धनराज कुंभार, सुरेश पारिस्कर, गोपालशेठ कुंभार, लक्ष्मनशेठ कुंभार, भगवानशेठ कुंभार, सुधाकर पंडीत, धनराज कुंभार, शामराव कुंभार, लक्ष्मण हिवरकर, मुरलीधर न्हावकर, कैलास कापडे, सतिष पंडीत, संजय पंडीत, राजेंद्र पंडीत, मयूर पंडीत, आत्माराम सोनवणे, इतर उपस्थित होते.

One thought on “बारा बलुतेदार समाजाच्या बैठकीत मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्याचा निर्धार ; स्मिता वाघ यांना निवडून आणण्याचे आवाहन

  1. प्रत्येक समाज त्यांचे साठी मागण्या करत असतो. पण बाराबलूतेदार ही सर्व समावेशक आणि आदर्श समाज रचना छ.शिवाजीमहाराज कींवा त्यांचे आधी पासून आहे. सर्वंकष समाजाचा अर्थ पूर्ण ऊत्कर्षाचा महामंत्र संकल्पनेत आहे. आजच्या परिस्थितीत सबका साथ सबका विकास हाच मार्ग मा.पंतप्रधान श्री मोदी जी चा आहे. ते साकार व्हावे हि सदिच्छा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!