Headlines
Home » महाराष्ट्र » संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यात मुख्य आरोपी ; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

संजय राऊत हे खिचडी घोटाळ्यात मुख्य आरोपी ; संजय निरुपम यांचा गंभीर आरोप

मुंबई | दि.८ ( वास्तव पोस्ट न्यूज )– काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम यांनी संजय राऊत हे खिचडी घोटाळा चोरी प्रकरणाचे मास्टर माईंड असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये संजय राऊत यांची पत्नी, मुलगी, भाऊ त्याचबरोबर त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांच्या खात्यात पैसे जमा झाल्याचा दावा निरुपम यांनी केला आहे.

दरम्यान अमोल कीर्तीकर हे आज खिचडी घोटाळा प्रकरणी ईडीसमोर चौकशीसाठी हजर झाले. कीर्तिकर हे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे उमेदवार असून त्यांच्या उमेदवारीला विरोध करणाऱ्या संजय निरुपम यांची काँग्रेसमधून हकालपट्टी झाली होती. त्यांनी माध्यमांसमोर बोलताना संजय राऊत यांनी एक कोटी रुपयांची दलाली घेतली असल्याचा आरोप करत ईडीनं त्यांना अटक करावी, अशी मागणी केली.

काँग्रेसचे माजी नेते संजय निरुपम म्हणाले की, “संजय राऊत यांचे नाव थेट या घोटाळा प्रकरणाशी जोडले गेले नाही. तरी त्यांनी या घोटाळ्यामध्ये आपली पत्नी, मुलगी व भाऊ यांना लाभ करून दिला आहे. त्यांच्या खात्यामध्ये या घोटाळ्याचे पैसे जमा झाल्याची आकडेवारीही निरुपम यांनी दिली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती ईडीला असल्याचंही ते म्हणाले आहेत. या प्रकरणात संजय राऊत यांची चौकशी करून त्यांना अटक करावी, अशी मागणी संजय निरुपम यांनी केली.

कोरोना काळात स्थलांतरित मजुरांना खिचडी वाटप करण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले होते. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनियमितता होऊन मुंबई महानगरपालिकेसोबत अंदाजे ६ कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाल्याचा दावा ईडीने केला आहे. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी २७ मार्च २०२४ रोजी अमोल किर्तीकर यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काही तासातच त्यांना ईडीकडून खिचडी घोटाळा प्रकरणात समन्स पाठवण्यात आले. उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे सध्याचे खासदार गजानन कीर्तिकर हे अमोल कीर्तिकर यांचे वडील असुन गजानन कीर्तिकर हे सध्या एकनाथ शिंदे गटासोबत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!