Headlines
Home » सामाजिक » नवीन जमाना; सासु सुनेच्या वास्तविकता

नवीन जमाना; सासु सुनेच्या वास्तविकता

वडील नेहमी बुद्धिबळात हरत असतात आणि हसत असतात बुद्धिबळाची ती चाल हरण्यामागचं हसणं आता समजलं.

एक नवीन सुनेची कहाणी. जसं ही सासरी गेली, तसं तिथं सासुशी भांडण होऊ लागलं. तिला वाटू लागलं की सासू प्रत्येक गोष्टीत माझी चूकच काढते. आहे रागवतं आहे, ओरडतं आहे, हेवा करते, असं बरंच काही वाटू लागलं. तिनं बराच प्रयत्न केला आपल्या परीने हा मामला मिटवायचा पण काही यश आलं नाही. जेव्हा सासू काही सांगत असेल तर सून काही वेगळंच सांगत असते. आणि हे भांडण बऱ्याचदा मोठं होत असे. नवऱ्याला पण वाटतं की काय चालले आहे कोणाची बाजू घ्यायची? आईची की बायकोची ? हा मोठा प्रश्न पडत असे.

एक दिवस पत्नीने पतीला सांगितले की, आता हे घर सोडून दुसरीकडे भाड्याच्या घरात जाऊन राहू. पण या सासु जवळ काही रहायचं नाही, असे ती बोलू लागली. मी काही या घरात या सासु जवळ राहणार नाही. पतीने मोकळेपणाने सांगितले की आई काही चुकीचे बोलणार नाही. आईची कोणतीही गोष्ट चुकीची नसते ती आपल्या भल्यासाठीच तर करत असते. काही सांगत असेल, ते तू वाईट वाटून घेऊ नको, लक्ष देऊ नको. बायकोला राग आला, आणि म्हणाली तुम्ही तर तिचीच बाजू घेत असतात. ती नाराज होऊन माहेरी गेली.

बायकोचे वडील आयुर्वेदिक डॉक्टर होते. त्यांना आयुर्वेद औषधी गुण माहीत होते. ते खूप हुशार डॉक्टर होते. वडिलांकडे गेली आणि म्हणूं लागली की मला असली विषारी औषध दया, पुड्या दया की सासूबाई कायमच्याच या दुनियेतुन निघून जातील. बायकोचे वडील खूप नाराज झाले आणि म्हणाले मी तुला विषारी औषधी पुडया देतो ते तू तुझ्या सासूला देणार, सासू मरण पावणार पोलीस येणार, तुला घेऊन जाणार, तुझी चौकशी होणार, तू ते सांगणार औषध कोणी दिले कोठून दिले का दिले? पोलीस चौकशी करणार, माझ्याकडे येणार, मला अटक करणार तुला अटक करणार, तू दोन्ही घरं बरबाद करणार हे तुझं चुकीचं पाऊल आहे.

मला काहीतरी मार्ग सांगा जेणेकरून मला माझ्या सासुपासून सुटका मिळेल. काहीतरी असे औषध दया. मला या सासुपासून मुक्ती मिळेल. मला तिचं तोंड देखील पाहायचं नाही.

वडील म्हणाले मी काही पावडरच्या पुड्या देतो. रोज त्या पुड्या सासूबाईंच्या जेवणात थोड्या थोड्या मिक्स करत जा, हा प्रकार सहा महिने कर. सहा महिन्यानंतर सासूबाई स्वतः आतून कमजोर होतील आणि त्या मरून जातील. डॉक्टरला पण कळणार नाही की ह्या कोणत्या आजाराने मेली असेल. आणि तुझ्यावर कोणी संशयही घेणार नाहीत. आपण सर्व वाचू, निर्दोष राहू. पण एक अट आहे, की या सहा महिन्यांत तू सासुबाईशी बोलताना काळजीपूर्वक बोल. त्यांची पूर्ण पणे काळजी घेत जा कोणत्याही प्रकारे उलटसुलट बोलू नकोस. त्यांची मनाने सेवा कर. जेणेकरून कोणीही तुझ्यावर संशय घेऊ शकणार नाहीत. कोणी बोलू शकणार नाहीत की सुनेने सासूला मारलं.

ती खूप खुश झाली. वडिलांचे आभार मानले की वडिलांनी मला योग्य मार्गदर्शन केले, चांगला रस्ता दाखवला ती मनातून खूप हुरळून गेली. ती परत आपल्या सासरी गेली. त्या दिवसापासून ती खूप खुश राहू लागली. रोज स्वयंपाक केल्यानंतर सासूबाईंच्या जेवणात थोडे थोडे पुडीतील पावडर मिसळत होती. तिची वर्तुणूक बदलली, तिची बोलण्याची भाषा बदलली, सासूबाई काही सांगितली की चुपचाप ऐकत होती.

एक दोन महिने गेल्यानंतर सासुबाईला पण वाटू लागले की सूनबाईमध्ये हा बदल कशामुळे झाला. तिचे बोलणे, चालणे, वर्तुणूक कशी बदलली. हळूहळू दोघींच्या मध्ये भांडण कमी होऊ लागलं. त्यांच्यामध्ये दोस्ती होऊ लागली. पाच सहा महिने पूर्ण होत आले. आता सासू सुनेमधले नातं फार बदललं होतं. त्यांच्यामध्ये आई आणि लेक यांचं नातं तयार झालं. सुनेला वाटू लागले की ही खरोखरच माझी आई आहे. मी उगीचच सासूबाईंना चुकीचे ठरवत होते.

सहावा महिना चालू झाला होता. वडिलांनी सांगितले होते, सहा महिन्यानंतर सासूबाईंचं मरण जवळ आलं होतं, त्या आता मरणार असं वाटू लागलं. ती घाबरून आपल्या वडिलांकडे पळत पळत गेली. वडिलांना म्हणू लागली काहीही करा मला मदत करा. जी तुम्ही मला औषध दिले होते त्याचे काही परिणाम होऊ देऊ नये असं औषध द्या. जेणेकरून माझ्या सासूबाई ही दुनिया सोडून जाणार नाहीत. त्या तर देवी समान आहेत. त्यांची सेवा केल्यानंतर, त्यांच्याशी बोलल्या नंतर असं वाटू लागले की ह्या तर माझ्या आईप्रमाणे आहेत. आईप्रमाणे मला संमजवतात. मी फालतू विचार करत होते. वडील म्हणाले तू काही काळजी करू नको. मी तुला काही नवीन औषध देणार नाही. कारण त्या पावडरची पुडीत मुळातच औषध नव्हतेच. ते पचनक्रियाचे एक प्रकारचे औषध होते. ते तू रोज तुझ्या सासूबाईंच्या जेवणात घालत होतीस. काही घाबरायचं काम नाही. वडील हे सांगून हसू लागले. त्या मुलीला पण हसू आले. जी सून म्हणून कर्तव्य पार पाडत होती. तिला समजून चुकलं होतं की, वडिलांनी पण मुश्किल परिस्थिती ही योग्य सल्ला दिला होता. वडीलही हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही मुलांना काय शिकवता हे जरुरी चे आहे.
जीवनात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, की तुम्ही कितीही मोठं व्हा,आपल्या आईवडिलांचा सल्ला नेहमी योग्य दिशा देणाराच असतो .कोणत्याही आईवडिलांना आपल्या मुलाचं जीवन आनंदी व्हावं असंच वाटतं. आई वडीलांशी नेहमी चर्चा करत जा, ते तुम्हाला चांगलाच सल्ला, मार्गदर्शन देणार. परंतु आजकाल ची मुल मुली हे फारच वेगळे होत चालले आहेत. खास करुन मुली तरी प्रत्येक बाबतीत त्यांचे काही तरी वेगळेच असते तुम्ही शिकलेल्या मुली आहेत. थोड धीराने वागायला शिका मुलगा असो किंवा मुलगी हे आज थोडी देखिल तडजोड करायला तयार नाहीत. तडजोड हा आयुष्यातील फारच सुखकर मार्ग आहे. अगदीच पटतच नाही, सुनेचे आणि सासुचे तर त्यावर अनेक मार्ग आहेत जे की आपण सहज काढु शकतो. पण आजकाल तेवढाही धीर नाही मी वरील विषयात तुम्हाला उदाहरणाद्वारे समजुन सांगितले आहे. परंतु रोजचे जर आपण भांडणे बघितली तर डोक बंद होत. इतक्या अफाट समस्यांनी संसार उदवस्त होताय. फारच भयंकर परस्थीती आहे. कालचेच एक उदाहरण आहे. पती पत्नीचा भांडणात एका पाच वर्षाच्या चिमुरडीला तीचा वडीलांनी ट्रक खाली फेकले, पण सुदैवाने ट्रक जागीच थांबला म्हणुन मुलगी बचावली, नाही तर हा विषय किती गंभीर होता. असे अनेक विषय आहेत. चुक नेमकी कोणाची हेच आजकाल समजने कठीण झाले आहे. पण नाहाकच विषयाला वेग वेगळे फाटे फुटतात. नको तो त्रास होतो, मुली मिळणे कठीण असे खुप काही आहे. कुठे चाललाय देश माझा रोज खुप वाईट वाईट घटना बघुन मनाची चाळणी होते. आयुष्य कमी त्यात शेकडो भानगडी सर्व फॅमेली कोर्ट भरभरून चालताय कॉन्सलर कडे मोठी लाईनच लाईन असते. वकीलाची तर चांदीच चांदी असते. पण आपल काय आपल्या उभ्या आयुष्याचे काय वेळ पैसा प्रतिष्ठा मानसिक स्वास्थ याचे काय? आपण कधी विचार केलाय का? ही खरोखरच खेदाची बाब आहे. जास्त तर परीवार एकमेकांच्या ईगो मुळे देखिल तुटताय. तु असा का? थांब मग मी तशी” असे सर्व चालले आहे. आई वडीलांचा रोल केव्हा येतो. जेव्हा मुलगा किंवा मुलगी एकमेकांविषयी आपापल्या घरी सांगायला लागतात तेव्हा तीथ पर्यत त्यांना काय माहीती असत. की तुमचे काय चालले आहे. मग कुठलेही आई वडील असोत आधी त्यांची मुल काय सांगताय तेच ते एकुण घेतात. आणि समजुन पण घेतात. मग ते कशेकाय वाईट असतील. तुम्ही ऐकाचे दोन त्यांना सांगितले आहे. असा विषय आहे. म्हणुन आई बाबा कुणालाही वाईट शिकवत नाहीत. ते मुलाचे असोत की मुलीचे एखादा अपवाद असु शकतो. पण सर्वच नाहीत.

आपल्या जीवनातील सर्व आई वडिलांना माझा नमस्कार.
सौ.भारती ज्ञा.कुमावत
समांतर विधीसेवा साहायक जळगाव,
ज्ञानभारती फाउंडेशन अध्यक्ष
समाजसेविका

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!