Home » सामाजिक » आजची तरुण पीढी, पटल तर घ्या

आजची तरुण पीढी, पटल तर घ्या

जळगाव | दि.१( वास्तव पोस्ट न्यूज ) – हा चोर तो भामटा,हा घरभेदी तो घरफोड्या,ह्याने त्याच्याशी गद्दारी केली त्याने याच्याशी…ही देशाचे भवितव्य घडवणारी लोकसभेची निवडणूक आहे की संगीत मानापमान?देशातील कोट्यवधी तरुण बिना लग्नाचे मरतील…शेतकरी तर मरतच आहेत.ह्यांना वाचवण्यासाठी काही नियोजन असेल तर त्यावर बोला.आजच्या तरुण पीढीची अवस्था बघा ते वाटेंल तो निर्णय घेता आहेत कारण त्यांच्या कडे पर्याय काय आहे ते वयात येणे थांबणार आहेत का? ते निसर्गाचा नियम बदलवु शकणार आहेत का अजुन इथुन पुढे विचार करायचा झाला तर तीस वर्षा पेक्षा जास्त कालावधी मुलींच्या घटत्या व वाढत्या समस्यांना भरून काढण्यास लागतील याला जबाबदार कोण?कमी वयाच्या मुलींवर सर्रास रेप होताय त्यात मुलगी पण जाते आणि मुलगाही जातो.आपण कितीही मुलांवर किंवा मुलींवर संस्कार केले तरी त्यांची शारिरीक उत्तेजना आपण थांबवु शकत नाही खरतर हे समाजाने समजुन घेणे गरजेचे होते की मुलींची गर्भाशयातच हत्या करणे शेकडो मुलींचा बळी गेला आहे या सर्वांचे उमलणारे रोपटे आपण उमलण्या आधीच मसळले.याला खरे जबाबदार कोण याचा आपणच विचार करावा!
….देश बांधवांनो व भगिनींनो भारतीय लोक तात्पुरत्या भावनांना जास्त महत्व देतात हे देशातील राजकारणी ओळखून आहेत, म्हणून येथील निवडणुका ह्यामूळ प्रश्ना वर न लढविता ,निरर्थक चर्चा करून भावनिक आधारे जिंकल्या जातात.
परवा आमच्या चोपडा येथील कुंटणखाना वर धाड टाकण्यात आली, साऱ्यांनी बातमी वाचली व लगेच विसरून गेले.

कुंटणखाना ही काळाची गरज आहे काय ? तेथील गैरप्रकार व लुटीचे किंवा शोषणाचे समर्थन कधीच होऊ शकत नाही.कारण कोणतीही स्री आनंदाने त्या व्यवसायात येणे शक्यच नाही.पण त्या आज सामाजिक स्वास्थ टिकवण्याचे काम करत आहेत हे मान्य करावेच लागेल.आणि हीच खरी वस्तुस्थीती आहे.कारण आपण विचार करू शकतो की आज मुलांची संख्या किती आहे हजार मुलांचा तुलनेत मुलींची संख्या ८०० पेक्षाही कमी आहे.याला जबाबदार कोण लिंग निदान चाचण्या सर्रास कोणी केल्या याचा जरा विचार करा

 भारतातील प्रत्येक गावात तिशी पार केलेले किमान शंभर तरुण बिना लग्नाचे ,हो बिना लग्नाचेच आहेत,एकेका तालुक्यातील १००गावांचा विचार केला तर संख्या किमान संख्या १०००० तरी आहे. साऱ्याच समाजातील मुलींची घटती संख्या बघता त्यांचे कधीच लग्न होणार नाही,हे वास्तव आहे. 

मग हे मुल वयात येणं थांबणार आहे का?निसर्ग थांबवणे तत्त्वज्ञान सांगण्या इतके सोपे आहे काय? यातून चुकीच्या गोष्टी समाजात घडत आहेत. समाजव्यवस्था मोडकळीस येवू शकते एव्हढा हा प्रश्न गंभीर आहे.

हा प्रश्न आज सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न कोणत्याही राजकीय पक्षाने केला व ते सत्तेत असले तर मुलं मुलींचे व्यस्त झालेले प्रमाण योग्य होण्यास तीस वर्ष लागतील.तो पर्यंत सामाजिक स्वास्थ टिकवण्याचे काम ह्या कुंटणखान्यातील महिला करीत असतात.

दुर्दैवाने त्यांचे दलाल ही शोषण करतात व इतर समाजही.तो व्यवसाय बरोबर की चूक या चर्चेत मी पडू इच्छित नाही.पण आज त्यांना सरकार कडून सहकार्याची गरज आहे हे नक्की.

“मुलं मुली असमतोल याचे जनक सरकारच व मार्ग देखील त्यांच्याकडेच पण ते दुरुस्त करण्याऐवजी जास्त खराब करीत आहे”. आदिवासी व मुस्लिम समाज वगळता इतर साऱ्या हिंदू धर्मातील समाजात हुंडा प्रथा होत्या,होत्या या साठी म्हणत आहे कारण आता लग्नाला मुलीचं मिळत नसल्याने हुंडा बऱ्यापैकी हद्दपार झाला. हेच चित्र आधी बदलले असते तर नक्कीच ही वेळ आज आली नसती.

यात शेतकरी वर्ग हा आधीच सरकारी धोरणांनी भरडला गेल्याने आपल्या मुलींना हुंडा देवू शकत नव्हता.म्हणून समाजातील दृष्ट डॉक्टरांना हाताशी धरून विज्ञानाचा दुरुपयोग करून मुली पोटातच मारण्याचे पाप साऱ्यांनी केलं त्याचेच दुष्परिणाम आपण बघत आहोत.

त्यात दुहेरी मार शेतकऱ्यांच्याच मुलांना बसतो आहे कारण नोकरी वाला मुलीला सारे सुख देवू शकतो पण शेतकरी तिची हौस मौस पूर्ण करू शकत नाही ,हे शेतकऱ्यांचे बायकांना माहित असल्याने किमान आपल्या मुलीला चांगले आयुष्य जगता यावे या साठी ती नोकरी वाला जावई बघायला सांगते. शेती करणारे शेतकऱ्यांची पोर बिना लग्नाचेच मरत आहेत.

  सध्या हे सारी मुल निवडणुकीला कार्यकर्ते म्हणून कामाला येतील असा साऱ्यांचा प्रयत्न असतो.पण त्यांचे भवितव्य सुधारावे असे कुणाही राजकारण्याला वाटतं नसल्याने देश सुधारेल असे चित्र सध्या तरी दिसत नाही.

येणाऱ्या उमेदवारांना विचारा शेतकऱ्यांचे समस्या काय? तुम्ही काय करणार,? लोकसभेत हे पोटतिडकीने मांडून आपल्या नेत्याला प्रश्न सोडवण्यास भाग पाडणार की नेत्यांचे व सरकारचे मत कसे योग्य यावर आम्हालाच तत्त्वज्ञान शिकवणार?तुम्ही नाही किमान तुमच्या भावी पिढी साठी तरी काहीतरी बोला.तसेच आपल्या सर्वांना मिळुन हा विचार करणे गरजेचे आहे की या सगळ्यात ही तरुण पिढी किती भरडली जाते आहे. त्यांचे मन काय म्हणत असेल या सर्वांचा आपण आज विचार करणे अत्यंत गरजेचे आहे.या सगळ्या विषयांमुळे महीला व मुलींचे. आपल्या घरात सुरक्षीत राहाणे देखील चिंतेचीच बाब आहे.मागे तीन चार महीन्यांपुर्वी लोणी ता.वैंजापुर येथील एका ८०वर्ष वयाच्या आजीवर एका तरुण मुलाने रेप केला व आजीच्या डोक्यात दगड घालुन तिला मारून टाकले त्याला पोलिसांनी विचारणा केली असता त्याने उत्तर दिले की मी ३४ वर्षाचा झालो आहे माझे लग्नच जमत नाही यावर तुम्ही विचार करा पुढची परस्थीती काय असणार आहे.
…पटल तर घ्या…

सौ.भारती ज्ञा.कुमावत
जळगाव
समाजसेविका

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!