Headlines
Home » शैक्षणिक » मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी

मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी उत्साहात साजरी

जळगाव | दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – आज जळगाव येथील मानवसेवा विद्यालयात पर्यावरण पूरक होळी साजरी करण्यात आली. यात दुर्गुण, भ्रष्टाचार, धुम्रपान, मद्यपान यांची होळी करण्यात आली. तसेच धुलिवंदन निमित्त नैसर्गिक रंग वापरण्याचा संकल्प करण्यात आला.

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतिभा सूर्यवंशी यांच्या हस्ते होळीची पूजा करण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना होळी सणाबद्दल माहिती सांगुन त्यांना पाणीबचतीचा संदेश देण्यात आला.

शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी शालेय परिसरातील कचरा, पाला-पाचोळा, वाळलेल्या झाडांच्या फांद्या होळीसाठी जमा करून परिसर स्वच्छ केला व पर्यावरणाला व निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी होऊ न देता होळी साजरी केली. धुलिवंदन निमित्त रासायनिक रंग न वापरात नैसर्गिक रंग वापरण्याचा व पाण्याची नासाडी न करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, माया अंबटकर, मुक्ता पाटील, उपशिक्षक अलका महाजन, रत्ना चोपडे, अनिल शिरसाठ, गिरीश जाधव, व विद्यार्थी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!