खर तर हा विषय थोडा वेगळाच आहे. सर्वांना पटेलच असे नाही पण वस्तुस्थिती मांडणे देखिल गरजेचे आहे. विषय जरी एकच असला तरी त्या पासुन समस्या मात्र शेकडो आहेत. तर आपण उशिरा विवाह झाल्याने काय परीणाम होतात. ते आपण या आजच्या आपल्या लेखात बघणार आहोत.
मुलगी किंवा मुलगा जन्माला आल्यानंतर प्रत्येक आई-वडील त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत असतात. तसेच ते त्यांना शिक्षणही देतात. पण काही मुले व्यवसायाकडे वळतात काही मुल वडीलोपार्जीत व्यवसाय करतात. तर काही मुल स्वतःचे अस्तीत्व स्वतः निर्माण करतात. असे सगळे चालत असतांना मुला मुलींना दहावी बारावी पर्यंत शिक्षण घेत असतांना खुप चांगले लक्ष देऊन शिकवले जाते. परंतु नंतर आपण फार मोठ्या अपेक्षा ठेवुन त्यांना रोजच सांगत असतो बाळ तु हे कर ते कर अशा काही पालकांच्या अपेक्षा असतात. असो… असल्या तरी त्या काही वाईट नाहीत. पण ? कसे आहे मुले मुली बारांवी नंतर जो काही विषय निवडतात म्हणजे शिक्षणाची साईड, ती बारावीं नंतर कमीत कमी पाच वर्ष असते. मग तेव्हा पर्यत त्यांचे वय हे बावीस तेवीसच्या जवळ पास असते. मग त्यांची डीग्री झाली. की मग ते पुढे चोवीसाव्या वर्षात पदार्पण करतात. मग सुरू होतो नोकरी शोधण्याचा जीवघेणा प्रवास. मग त्यात जर एम पी एस सी करणारे मुले किंवा मुली असतील तर विचारायचेच काम नाही. कारण ते केव्हा यशस्वी होतील खात्रीच नसते. झाले तर पहील्याच प्रयत्नात होतील नाही तर पाच सात वेळा प्रयत्न करूनही होत नाहीत. पण हे काहीही करत असतांना एका बाजुने वय मात्र झपाट्याने वाढत असत. दुसरी कडे डॉक्टर, इंजिनिअर्स मंडळींचे पण गणित वेगळेच असते. आधीच शिकुन वय अठ्ठावीस तीशीच्या घरात आलेले असते. मग ते थोडे स्थिर होतात. मग कुठे तीशी नंतर विवाहाचा विषय सुरू होतो. मग सगळे जमत करत ही मंडळी कुठे पस्तीशी पर्यत पोहचते. मग कुठे मुलगीही अठ्ठाविस तीस च्या जवळ पासची भेटते. मग त्यांना विवाहानंतर लगेचच मुल नको असत. मग ते मुल हळुहळु च्याळीशीच्या उंबरठ्यावर होत. किंवा होतही नाही तिथेच भांडण सुरु होतात. नको ते विषय समोर येतात. दोघ परीपुर्ण परीपक्व असल्यामुळे एकमेकांना समजुन घेतील हा समज फक्त बोलण्या पुरता उरलेला असतो. दोघ पण समजण्याच्या पलीकडे असतात. मग पुढे काय आधीच लग्न उशिराने झालेले असते. त्यात एकमेकांना समजुन चालणे अती गरजेच असतांना तस होत नाही कारण. ते खुप कमी वेळ एकमेकांसोबत घालवतात. त्यातल्या त्यात मुलगी जास्त वर्ष माहेरी राहीली म्हणजे वयाची तीस पस्तीस वर्ष तर तीला नवीन परिवारात रुळायला फारच वेळ जातो. किंवा ती रुळतही नाही. म्हणुन मुलगी जसजशी वयात येते तसेतसे तिला तिच्या लग्ना बद्दल सांगितले जाते. तेच संस्कार तिला दिले जातात. मग ती चांगली शिकुन जर का वयाच्या बाविस तेवीसाव्या वर्षीच लग्नाचा निर्णय घेऊन लग्न करत असेल तर वेळेत सर्व पुर्ण होत. म्हणजे एकमेकांची मन जुळणे, लवकरच बाळ होणे तेही चांगले सुद्रुढ बाळ होणे. एकमेकांचे विचार जुळने आयुष्यात तडजोड करायला शिकणे असे अनेक विषय चांगले होतात.
बरेच आई वडील मुलगी चांगली शिकली आहे. म्हणुन तिला तिच्याही पेक्षा जास्त शिकलेला व कमवणारा वर मुलगा शोधतात आणि तिचे वय किती वाढते आहे याकडे दुर्लक्ष करतात. काही ठिकाणी तर मुलगी फक्त बारावी शिकत असते किंवा घरी असते तरी नोकरी करणाराच मुलगा पाहीजे घरची शेती पाहीजे स्वतःचे घर गाडी सर्वच पाहीजे. मग आम्ही विचार करू असे करत करतच वेळ निघुन जाते. असे अनेक उदाहरण आहेत. की त्यातुन मुली वेगवेगळे निर्णय घेतात. काही मुल मुली पालकांचे ऐकुनच घेत नाहीत तर काही ठिकाणी पालक मुलांना समज देत नाहीत. तर या सर्व समस्या तर आहेतच परंतु यामुळे एक तर लग्न होतं, झाले तर बाळ उशिरा होते. ते पण झाले तर ते शारिरीक कमजोर असते किंवा मानसिक कमजोर असते. असे काहीना काही विषय असतात. त्यात नाहीच मन जुळले तर घटस्पोट होतात. म्हणजे आज काल लग्न करणे आणि केलेच तर ते टीकवणे दोघ विषय म्हणजे तारेवरची कसरत होऊन बसले आहे. कारण मुला मुलींचे शिक्षण जरी खुप प्रगल्भ झाले आहे तरी विचार मात्र प्रगल्भ झालेले नाहीत. कारण एक आताची शोकांतिका आहे. अनपढ लोक घटस्पोटासाठी कमी येतात. आणि शिक्षीत जोडपी सर्वात जास्त असतात. याला आपण काय संबोधणार कुणाचे काय व कुठे चुकत आहे. हे लक्षात घ्या कारण तुम्ही कितीही करीअर केले तरी शेवटी एकतरी बाळ प्रत्येकाला हव आहेच ना? हे देखिल विचारात घेणे गरजेचे आहे.
पुर्वीचा लोकांचे च्याळीस पंन्नास वर्ष संसार व्हायची आता तर चाळीस दिवस टिकवणे कठीण झाले आहे. म्हणुन तुम्ही यशस्वी जरुर व्हा हरकत नाही पण विवाह मात्र वेळेत करा आणि जोडीदार थोडा हलका भारीच पाहीजे सारखा नको टिकवायला अवघड जातो. कारण समज समज चा फरक असतो. दोन धारदार तलवारी एकाच म्यान मधे राहाने शक्य नाही तसेच काहीसे बरोबरीचे देखिल गणित असतात. आता लोकांना आयुष्य फार कमी आहे कधी काय होईल सांगणे आवघड आहे. म्हणुन प्रत्येकाने विचार करा एक विशीष्ठ वयातच विवाह करा. आणि सुखी जीवन जगा म्हणजे फॅमेली कोर्टाचा पण लोड कमी होईल. खुप भरमसाठ घटस्पोट होता आहेत. एक तर मुली मिळत नाही मिळाल्याच तर त्या टिकतच नाहीत. म्हणुन सुरूवात लवकर करा सगळे नीट व्यवस्थित होईल.
सौ.भारती ज्ञानेश्वर कुमावत
समांतर विधीसेवा सहाय्यक,
ज्ञानभारती फाउंडेशन अध्यक्षा
समाजसेविका

सत्य परिस्थिती आहेत ….खूप छान लेख आहे
Nice