जळगाव | दि.१६ ( वास्तव पोस्ट न्यूज )– जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे बौद्ध विहारात विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या कार्यकारणी निवडी बाबत समाजबांधवांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. सदर मिटिंगमध्ये म्हसावद गावाचे सरपंच गोविंदा पवार यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. खजिनदार पदी अमित सोनवणे तर उपाध्यक्षपदी महेंद्र शिंदे यांची निवड करण्यात आली.
यावेळी समाजातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिनदार यांच्या हस्ते महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि खजिनदार यांचा सत्कार सतीश सूर्यवंशी व समाज बांधवांच्या वतीने करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

जय भीम
जय भीम जय संविधान