Headlines
Home » सामाजिक » पाचोरा येथील पत्रकारांनी दिली माणुसकीची अनुभूती; परप्रांतीय जखमी इसमास मदतीचा हात

पाचोरा येथील पत्रकारांनी दिली माणुसकीची अनुभूती; परप्रांतीय जखमी इसमास मदतीचा हात

जळगाव | दि.१५ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – पत्रकार आणि पत्रकारिता या संदर्भात समाजातील विविध घटनांकडून साधक बाधक प्रतिक्रिया व समज गैरसमज व्यक्त होत असतात. त्यात कितपत तथ्यांश असायचा तो असो. परंतु पाचोरा येथील काही पत्रकारांनी मात्र सामाजिक संवेदना व मानवतेचा ओलावा सिद्ध करून पाचोरावासीयांना माणुसकीची अनुभूती दिली आहे. पत्रकारांच्या या मानवतावादी कार्याचे कौतुक होत आहे.

सविस्तर वृत्त असे की, पाचोरा येथील गजबजलेल्या व वर्दळीच्या रेल्वे स्टेशन रस्त्यावरील पोस्ट ऑफिसच्या प्रवेश द्वाराजवळ गेल्या तीन चार दिवसांपासून बिहार राज्यातील एक मध्यमवयीन इसम जखमी अवस्थेत विव्हरत व मरणप्राय यातना सोसत पडलेला होता. या भागातील रिक्षाचालक, दुकानदार यांनी त्यास चहापाणी व खाद्यपदार्थ देऊन उभे करण्याचा प्रयत्न केला परंतु तो मरणासन्न अवस्थेत असल्याने सुधा शांती शांती हॉटेलचे मालक मनोज शर्मा यांनी ज्येष्ठ पत्रकार प्रा. सी.एन. चौधरी व सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार अनिल येवले यांना या इसमा संदर्भात माहिती दिली. त्यानुसार प्रा.सी.एन. चौधरी व अनिल येवले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदरचा व्यक्ती गटारी काठी मरणासन्न अवस्थेत पडलेला होता.

प्रा. सी.एन. चौधरी व अनिल येवले यांनी १०८ क्रमांकावर फोन करून त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार पत्रकार तथा ग्रामीण रुग्णालयाचे चालक नरसिंग भुरे यांच्या रुग्णवाहिकेला या संदर्भातील माहिती प्राप्त झाल्यानंतर ते रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी आले. प्रा.सी.एन. चौधरी, मनोज शर्मा, अनिल येवले, गणेश शिंदे, नरसिंग भुरे यांनी त्या अत्यवस्थ इसमास रुग्णवाहिकेत टाकून ग्रामीण रुग्णालयात आणले. त्याचेकडून घरचा पत्ता व ओळख पटविण्या संदर्भातील माहिती काढण्याचा प्रयत्न केला. व त्याचेवर डॉक्टरांकडून उपचार सुरू केले. पत्रकारांच्या या मानवतावादी कृत्याचे अनेकांनी कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!