Headlines
Home » राजकीय » काँग्रेसची दुसरी यादी: मध्य प्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी जाहीर

काँग्रेसची दुसरी यादी: मध्य प्रदेश-राजस्थानसह सहा राज्यांतील ४३ उमेदवारांची यादी जाहीर

नवी दिल्ली | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी आज दुसरी यादी जाहीर केली. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ६ राज्यांमधून ४३ नावे जाहीर केले आहेत. यामध्ये आसाममधून १२, राजस्थानमधून १०, मध्य प्रदेशातून १०, गुजरातमधून ७, उत्तराखंडमधून ३ आणि दमण बेटातून १ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत ४३ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, आम्ही लोकसभा २०२४ च्या निवडणुकीसाठी आमच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने तीन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांनाही उमेदवारी दिली आहे.

माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून तिकीट देण्यात आले आहे. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे पुत्र वैभव गेहलोत यांना जालोरचे तिकीट देण्यात आले आहे. आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा मुलगा गौरव गोगोई यांना जोरहाटमधून तिकीट देण्यात आले आहे. काँग्रेसच्या या यादीत १३ ओबीसी,१० एससी, ९ एसटी आणि एक मुस्लिम उमेदवार आहेत.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीने (CEC) सोमवारी लोकसभा निवडणुकीसंदर्भात ६० हून अधिक उमेदवारांच्या नावांवर चर्चा केली. त्यापैकी ४० हून अधिक नावांना सीईसीने मंजुरी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!