Home » महाराष्ट्र » जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पास मंजुरी

जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्पास मंजुरी

मुंबई | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -राज्यातील जिल्ह्यांच्या विकासाला चालना देण्यासाठी जागतिक बँक सहाय्यित महाराष्ट्र जिल्हास्तरीय विकासास चालना देण्यासाठी संस्थात्मक क्षमता सक्षमीकरण प्रकल्प (Maharashtra Strengthening Institutional Capabilities in Districts for Enabling Growth Project MahaSTRIDE) राबविण्यास तत्वतः मान्यता देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. घेण्यात आला. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा कालावधी हा पाच वर्षांचा राहील.

या प्रकल्पाचा अंदाजित खर्च र २,२३२ कोटी (२६८.९७ मिलियन डॉलर्स) इतका असून सदर प्रकल्पाच्या कार्यान्वयासाठी आवश्यक असलेल्या एकूण निधीपैकी ७०% (अंदाजित रु १,५६२ कोटी / १८८.२८ मिलियन डॉलर्स) निधी जागतिक बँकेकडून कर्जाद्वारे व उर्वरित ३०% (अंदाजित र ६७० कोटी / ८०.६९ मिलियन डॉलर्स) निधी राज्य शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार

राज्याच्या सर्वसमावेशक विकासासाठी जिल्हा हा केंद्रबिंदू मानून सर्वसमावेशक आर्थिक विकासाला गती देणे, सार्वजनिक सेवा वितरणात सुधारणा करण्यासाठी जिल्ह्यांना सक्षम करण्याच्या दृष्टीने संस्थात्मक व्यवस्था, डेटा व्यवस्थापन, समन्वय व संनियंत्रण प्रणाली आणि प्लॅटफॉर्मसह राज्यस्तरीय नियोजन यंत्रणा सक्षम करणे ही या प्रकल्पाची उद्दिष्ट्ये असतील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!