Home » जळगाव » आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या अंबलबजावणीबाबत आढावा बैठक संपन्न

आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांच्या अंबलबजावणीबाबत आढावा बैठक संपन्न

जळगाव | दि.१२ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -आदिवासी विकास विभागांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत बैठक जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीला उपवनसंरक्षक यावल श्री. जमीर शेख, प्रकल्प अधिकारी श्री. अरुण पवार यांची उपस्थिती होती.

बैठकीत ग्रामपंचायत व तालुकास्तरीय समितीकडे प्रलंबित वैयक्तीक व सामुहिक वनदाव्यांचा आढावा घेण्यात आला. स्वाभिमान सबळीकरण योजनेंतर्गत भूमीहीन लाभार्थ्यांना जमीन वाटप करण्याची प्रलंबित प्रकरणांचा आढावा, प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजना अंमलबजावणीचा आढावा, पेसा ग्रामपंचायतीमध्ये ५ टक्के आबंध निधीची प्रभावी अंमलबजावणी करणे व अमृत आहार योजना अंतर्गत अंगणवाड्यांना सकस आहार पुरविणेबाबतचा आढावा, केंद्रीय योजना, ठक्कर बाप्पा योजना प्रलंबित प्रकरणे निर्गत करणे बाबत निर्देश देण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!