Home » राष्ट्रीय » मिशन दिव्यस्त्र: अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी,

मिशन दिव्यस्त्र: अग्नी-5 क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी,

दिल्ली | दि.११ मार्च ( वास्तव पोस्ट न्यूज ) -भारत सरकारच्या सूत्रांनी सांगितले की, “भारताने आज डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डी आरडीओ) ने मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी घेतली. मिशन दिव्यस्त्र नावाची उड्डाण चाचणी ओडिशातील डॉ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून घेण्यात आली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जटिल मिशनच्या संचालनात सहभागी झालेल्या डीआरडीओ शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एका पोस्टमध्ये ते म्हणाले, ” मिशन दिव्यस्त्रासाठी आमच्या डीआरडीओ शास्त्रज्ञांचा अभिमान आहे, मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) तंत्रज्ञानासह स्वदेशी विकसित अग्नी-5 क्षेपणास्त्राची पहिली उड्डाण चाचणी.”

अग्नी-5 क्षेपणास्त्र हे अग्नी मालिकेतील सर्वात लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र आहे ज्याचा पल्ला ५००० किमी आहे. देशाच्या दीर्घकालीन सुरक्षा गरजा लक्षात घेऊन अग्नी 5 क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र जवळजवळ संपूर्ण आशियाला आपल्या स्ट्राइक रेंजमध्ये आणू शकते, ज्यामध्ये चीनचा उत्तरेकडील भाग तसेच युरोपच्या काही भागांचा समावेश आहे. मिशन दिव्यस्त्राच्या चाचणीसह, भारत एमआयआरव्ही क्षमता असलेल्या देशांच्या निवडक गटात सामील झाला आहे.
MIRV तंत्रज्ञान नेमके आहे तरी काय ?
मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेबल री-एंट्री व्हेईकल (एमआयआरव्ही) हे एक तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये क्षेपणास्त्रामध्ये एकाच वेळी एकापेक्षा जास्त अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असते. ज्याच्या मदतीने तुम्ही शत्रूच्या वेगवेगळ्या लक्ष्यांवर मारा करू शकता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!