Home » राष्ट्रीय » इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

इलेक्टोरल बाँड्सची माहिती उद्यापर्यंत देण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे स्टेट बँकेला आदेश

लोकसभा निवडणूकी अगोदरच मिळणार इलेक्टोरल बाँड्सची माहिती

नवी दिल्ली | दि.११ ( वास्तव पोस्ट न्यूज )– सर्वोच्च न्यायालयात इलेक्टोरल बाँड्सची माहिती देण्यासंदर्भातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर आज सुनावणी झाली. सुनावणी वेळी सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला मोठा दणका दिला आहे.

इलेक्टोरल बाँड प्रकरणात आणखी वेळ मागण्यासाठीची स्टेट बँकेची याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायालयाने गेलेल्या फेटाळली. न्यायालयाने स्टेट बँकेला उद्या पर्यत म्हणजे मंगळवारी १२ मार्चपर्यंत उपलब्ध डेटा देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने १५ मार्चपर्यंत डेटा अपलोड करावा, असे न्यायालयाने म्हटले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्टेट बँकेला फटकारले : स्टेट बँकेने न्यायालयात बाँडशी संबंधित माहिती देण्यात आम्हाला कोणतीही अडचण नाही, परंतु त्यासाठी थोडा वेळ हवा आहे, अशी मागणी केली असता न्यायाधीशांनी एसबीआयला धारेवर धरले. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, गेल्या १५ फेब्रुवारीच्या सुनावणीपासून २६ दिवसांत तुम्ही काय केले? मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला, न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. त्यावेळी स्टेट बँकेच्या वतीने वकील हरीश साळवे यांनी युक्तीवाद केला.

दरम्यान, जर एसबीआयने या आदेशाचे पालन केले नाही, तर न्यायालयाच्या आदेशाची जाणीवपूर्वक अवज्ञा केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करू नये, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!