Home » क्रीडा » तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने एक डाव ६४ धावांनी इंग्लंडला लोळविले; मालिका ४-१ च्या फरकाने जिंकली

तिसऱ्याच दिवशी टीम इंडियाने एक डाव ६४ धावांनी इंग्लंडला लोळविले; मालिका ४-१ च्या फरकाने जिंकली

धर्मशाला | दि.०९ ( वास्तव पोस्ट न्यूज ) -येथे खेळल्या गेलेल्या पाचव्या अंतिम कसोटी सामन्यात एक डाव आणि ६४ धावांनी विजय मिळवून टीम इंडिया ने पाच सामान्याची ही मालिका ४-१ अश्या मोठ्या फरकाने आपल्या खिशात घातली.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडचा पहिल्या डाव २१३ धावांत गडगडला होता. या धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाने काल दुसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा २५५ धावांची आघाडी घेतली होती. आज तिसऱ्या दिवशी त्यात ४ धावांची भर घालत भारताचा पहीला डाव ४७७ धावांवर आटोपला. कुलदीपने ३० तर बुमराहने २० धावां केल्या. सिराज एकही धाव न करता नाबाद राहीला. अशा प्रकारे भारताने पहील्या डावाअखेर २५९ धावांची भक्कम आघाडी घेतली.

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरवात अतिशय खराब झाली १०३ धावातच निम्मा संघ गारद झाला , व येथेच भारताने आपला विजय निश्चित केला. रूट शिवाय एकही फलंदाज तग धरु शकला नाही, त्याने १२८ चेंडूत ८४ धावा केल्या. रुटला कुलदीप यादवने बुमराह कडे झेल देण्यास भाग पाड़ले. ब्रेंस्टो ने ३९ धावा करत थोडाफार प्रतिकार केला. आपला शंभरावा कसोटी खेळणाऱ्या आर अश्विनने आपल्या फिरकीच्या जाळ्यात इंग्लंडच्या फलंदाजांना ओढलं. पाच फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवून भारताकडून ३६ वेळा डावात ५ बळी घेण्याचा विक्रम केला. हा विक्रम याआधी अनिल कुंबळेच्या नावे होता. बुमराह व कुलदीपने प्रत्येकी २, तर रविंद्र जडेजा ने १ गडी बाद केला. सामनावीरचा पुरस्कार कुलदीप यादवला तर मालिकावीरचा पुरस्कार यशस्वी जैस्वालला देण्यात आला.

टीम इंडियाने ११२ वर्षांनंतर केला ऐतिहासिक विक्रम : कसोटी मालिकेत ०-१ अशा पिछाडीनंतर भारतीय संघाने सातव्यांदा मालिका जिंकली. भारतीय संघाने धर्मशाळा येथील हा सामना जिंकताच ११२ वर्षांनंतर कसोटी इतिहासात ऐतिहासिक विक्रम केला. हा विक्रम ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना गमावून पुढील ४ सामने सलग जिंकण्याचा आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत केवळ ३ वेळा असे घडले आहे. पहिल्यांदा १८९७-९८ मध्ये ॲशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडविरुद्ध ही कामगिरी केली होती. यानंतर ऑस्ट्रेलियानेच दुसऱ्यांदा या कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्यांनी १९०१-१९०२ च्या ऍशेस मालिकेत इंग्लंडचा ४-१ ने पराभव केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!