नवी दिल्ली | दि.२९ ( वास्तव पोस्ट न्यूज )– दिल्लीतून भाजपची लोकसभा उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होणार असल्याची माहीती समोर येत आहे. ही यादी १ किंवा २ मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे. भाजपच्या पहिल्या यादीत मोदींचं नाव असणार आहे. २९ फेब्रुवारीला होणाऱ्या भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.
महाराष्ट्रातून या नेत्यांचा पत्ता कट ?
पंकजा मुंडे, गिरीश महाजन आणि सुधीर मुनगंटीवर हे तीनही दिग्गज भाजप नेते लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची चर्चा आहे. भाजपकडून २३ लोकसभांसाठी निवडणूक निरिक्षकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यात पंकजा मुंडेंकडे उत्तर मुंबई, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांकडे उत्तर पूर्व तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे बीड लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे पंकजा मुंडे, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या चर्चांना जोर आला आहे. दरम्यान भाजप निवडणूक निरीक्षकांची गुरुवारी बैठक होणार असुन निवडणूक निरीक्षक स्थानिक खासदारांच्या कामगिरीचा आढावा घेतील. तसेच स्थानिक खासदारास दोन पर्याय कोण ? याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.
पीएम मोदी पुन्हा वाराणसीतून
१०० उमेदवारांच्या पहिल्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावही असण्याची शक्यता आहे. पीएम मोदी तिसऱ्यांदा वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील.
