Headlines
Home » राष्ट्रीय » लोकसभा २०२४: मार्च नंतर घोषणा ; आर्टिफिशियल इंटेलिजेन्स उमेदवारांवर ठेवणार नजर

लोकसभा २०२४: मार्च नंतर घोषणा ; आर्टिफिशियल इंटेलिजेन्स उमेदवारांवर ठेवणार नजर

नवी दिल्ली, दि.२३ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – लोकसभा निवडणूक २०२४ च्या तारखेच्या संदर्भात सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा १३ मार्च नंतर होण्याची शक्यता आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकांची तारीख जाहीर करण्यापूर्वी निवडणूक आयोगा जम्मू- काश्मीरचा दौरा करण्याची शक्यता आहे.

दरम्यान पश्चिम बंगालमधील संवेदनशील बूथची यादी निवडणूक आयोगाने मागवली आहे. तसेच यंदाची लोकसभा निवडणूक ही ७ ते ८ टप्प्यांत घेतली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सार्वत्रिक निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोग बहुतांश राज्यांचा दौरा करत आहे. सध्या निवडणूक आयोगाचे अधिकारी तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. तामिळनाडू दौरा आटोपल्यावर उत्तरप्रदेश आणि जम्मू-काश्मीरला भेट देणार आहेत. हे सर्व दौरे मार्च महिन्याच्या आधी होणार आहेत. दौरे पूर्ण झाल्यावर निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली जाईल.

यंदाच्या निवडणुकीत आयोगाकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे AI वापर करण्यावर विचार सुरु आहे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर चुकीची माहिती ओळखण्यासाठी आणि ती हटवण्यासाठी निवडणूक आयोगात आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी एक स्वतंत्र विभाग कार्यरत होऊ शकतो . निवडणुकीच्या काळात सोशल मीडियावर खोटा, चुकीचा किंवा आक्षेपार्ह आणि वादग्रस्त मजकूर असेल तर आयोगाकडून कठोर कारवाई व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचे अकाऊंट सस्पेंड किंवा ब्लॉक करण्याची शिफारस केली जाऊ शकते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!