जळगाव, दि.२२ ( वास्तव पोस्ट न्यूज )– महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाद्वारे जळगाव जिल्ह्याच्या महत्वाच्या स्थळांच्या प्रचारासाठी चलचित्रफीत प्रसारित करण्यात आली आहे. पर्यटनामुळे जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच जिल्ह्यात रोजगार देखील उपलब्ध होईल.
जळगाव जिल्हावासीयांनी विविध समाजमाध्यमात सदर चलचित्रफीत शेअर करुन आपल्या आप्तस्वकीयांना, मित्रांना जळगाव जिल्ह्यात पर्यटनासाठी निमंत्रित करावे व जिल्ह्याच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन पर्यटन विभागाकड़ून करण्यात आले आहे .
