Home » राष्ट्रीय » सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नाही; शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल

सरकारचा प्रस्ताव शेतकऱ्यांच्या हिताचा नाही; शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल

नवी दिल्ली,दि.२०( वास्तव पोस्ट न्यूज )- शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान सरकारने रविवारी चौथ्या फेरीत शेतकऱ्यांना काही पिकांवर एमएसपी देण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र सरकारचा हा प्रस्ताव शेतकऱ्यांनी फेटाळला असुन आपली भविष्यातील रणनीती स्पष्ट केली. आम्ही शेतकरी संघटनांसोबत बैठक घेऊन सरकारच्या प्रस्तावावर चर्चा केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सरकारने दिलेल्या प्रस्तावात काहीही तथ्य नाही.

शेतकरी नेते जगजित सिंग डल्लेवाल म्हणाले, आमचे सरकार १.७५ लाख कोटी रुपयांचे तेल बाहेरून आयात करते. यामुळे रोगराई होत आहे. देशातील शेतकऱ्यांना एमएसपी देण्यासाठी हा पैसा खर्च झाला तर काम होईल. म्हणजे सरकारवर वेगळा बोजा पडणार नाही. सरकारने काही पिकांवर एमएसपी देणार असल्याचे सांगितले. पण त्यालाही अनेक मर्यादा आहेत. या सर्व गोष्टींवरून शेतकऱ्यांना कोणताही फायदा होत नसल्याचे समोर येते. सरकारने २३ पिकांवर एमएसपी जाहीर करावा, अशी आमची मागणी आहे.

पुढची रणनीती स्पष्ट करताना शेतकऱ्यांनी सांगितले की, २१ फेब्रुवारीला रात्री ११ वाजता दिल्लीकडे कूच करणार आहोत. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, असे आवाहन आम्ही करतो. आम्हीही या देशाचे नागरिक आहोत, आम्हाला शांततेने आंदोलन करू दिले पाहिजे. आता यापुढे कोणतीही बैठक नाही. सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात किंवा आंदोलनाच्या माध्यमातून आम्हाला शांततेने करू द्यावेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!