Home » क्राईम » धरणगावनजीक पुलाखाली कापूस व्यापाऱ्यास लुटले ;दीड कोटी घेऊन पोबारा

धरणगावनजीक पुलाखाली कापूस व्यापाऱ्यास लुटले ;दीड कोटी घेऊन पोबारा

धरणगाव, दि.१७ ( वास्तव पोस्ट न्यूज ) – धरणगाव येथील दुर्गेश इम्पेक्स जिनिंगचे जवळजवळ दीड कोटी रुपयांचे पेमेंट जळगावहून कारने नेले जात होते. व्यापाऱ्याची कार अडवून तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम तीन चोरट्यांनी लुटून नेली. ही घटना आज दुपारी पावणेदोन वाजता धरणगाव नजीक मुसळी फाट्याजवळ घडली.

धरणगाव रोडवर उड्डाण पुलाखाली पैसे असलेली कार आली असता त्याचवेळी समोरुन बोलेरो कारने त्यांना धडक दिली , त्यात कारचे चाक पंक्चर झाले. ही संधी साधुन स्कारपीओतील तिघांनी कारमध्ये घुसत पैशांची बॅग घेवून अवघ्या काही मिनिटातच तब्बल दीड कोटी रुपयांसह तेथून पोबारा केला.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!