Headlines
Home » जळगाव » जळगाव क्रिकेट लीग-२०२६: ‘जळगाव किंग्स’ महागडी फ्रँचायझी, तर ओम मुंडे ठरला सर्वात महागडा खेळाडू!

जळगाव क्रिकेट लीग-२०२६: ‘जळगाव किंग्स’ महागडी फ्रँचायझी, तर ओम मुंडे ठरला सर्वात महागडा खेळाडू!

जळगाव l वास्तव पोस्ट न्यूज नेटवर्क

जळगाव जिल्ह्यातील क्रिकेटचा महाकुंभ मानल्या जाणाऱ्या जळगाव क्रिकेट लीग २०२६ (JCL T-20 पर्व-२)’ चा बिगुल वाजला आहे. रतनलाल सी. बाफना ज्वेलर्स प्रायोजित व जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित या स्पर्धेचे फ्रँचायझी आणि आयकॉन खेळाडूंचे ऑक्शन जैन हिल्स येथील ‘परिश्रम हॉल’मध्ये मोठ्या उत्साहात पार पडले. या लिलावात जळगाव किंग्स ही सर्वात महागडी फ्रँचायझी ठरली, तर ओम मुंडे याने सर्वात महागडा खेळाडू होण्याचा मान मिळवला.

फ्रँचायझी लिलावात चुरस; ‘दाल परिवार’ची बाजी

लिलाव प्रक्रियेत जळगाव किंग्स या संघासाठी सर्वाधिक चुरस पाहायला मिळाली. अखेर दाल परिवारने ही फ्रँचायझी आपल्या नावावर केली. जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची रूपरेषा मांडली. यावेळी उपाध्यक्ष एस.टी. खैरनार, युसूफ मकरा, खजिनदार राजेंद्र लढ्ढा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

ओम मुंडे ‘चाळीसगाव चार्जर्स’मध्ये

​आयकॉन खेळाडूंच्या बोलीमध्ये ओम मुंडे याच्यावर मोठी बोली लावण्यात आली. त्याला सागर पार्क क्रिकेट क्लबच्या चाळीसगाव चार्जर्स संघाने आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी हे पर्व अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.

JCL २०२६: संघ, मालक आणि आयकॉन खेळाडूंची संपूर्ण यादी

संघफ्रँचायझी मालकआयकॉन खेळाडूप्रशिक्षक
जळगाव किंग्सदाल परिवार (प्रेम व अतुल कोगटा)जगदीश झोपेघनश्याम चौधरी
चाळीसगाव चार्जर्ससागर पार्क क्रिकेट क्लबओम मुंडेसचिन सोनवणे
रावेर रॉयल्ससीए महावीर जैननचिकेत ठाकूरतनवीर अहमद
अमळनेर जायंट्ससुहांस केमिकल्स (संदीप काबरा)शुभम शर्माराहुल निंभोरे
पाचोरा टायटन्सएस.के. ट्रान्सलाइन (हेमंत कोठारी)सचिन चौधरीपंकज महाजन
जामनेर ब्लास्टर्सरमेशदादा जैनशतायू कुलकर्णीमुश्ताक अली
"जळगावच्या क्रिकेट प्रेमींना या पर्वात उच्च दर्जाचा खेळ पाहायला मिळेल. स्थानिक खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे."
अतुल जैन, अध्यक्ष, जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशन.

​या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड. सूरज जहांगीर यांनी केले, तर आभार अरविंद देशपांडे यांनी मानले. मुख्य पंच संदीप गांगुर्डे व हितेश पटेल यांनी लिलाव प्रक्रिया पार पाडण्यासाठी तांत्रिक सहकार्य केले. या स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील क्रिकेटला आता नवीन उभारी मिळणार आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!