Headlines
Home » जळगाव जिल्हा » कुरंगीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

कुरंगीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई

जळगाव l वास्तव पोस्ट वृत्तसेवा

नांद्रा (ता.पाचोरा) कुरंगी येथील गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूची अनधिकृतरीत्या वाहतूकीच्या ट्रॅक्टर वर पाचोरा तहसिलदार विजय बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली मौजे कुरंगी तालुका पाचोरा जिल्हा जळगाव येथून अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पकडून तहसील कार्यालय पाचोरा येथे जमा केले.

आज दि. २०मार्च, शुक्रवार रोजी सकाळी सात वाजता भरत नन्नवरे मंडळ अधिकारी कुऱ्हाड खुर्द भाग. वैशाली पाटील मंडळ अधिकारी नांद्रा, सुधाकर पाटील मंडळ अधिकारी लोहटार, रितेश गोसावी ग्राम महसूल अधिकारी लोहारी, वाय.डी. पाटील ग्राम महसूल अधिकारी गाळण, कुरंगी तलाठी वर्षा काकुसते यांनी ही कार्यवाही केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Top
error: Content is protected !!