जैन फूड पार्क येथील रक्तदान शिबिराचे उद्घाटन करताना प्रदीप सांखला, किशोर बाविस्कर, संजय पारख, सुनील गुप्ता, जी.आर. पाटील, राजेश आगीवाल, जी.आर. चौधरी
वास्तव पोस्ट l जळगाव : जैन इरिगेशन सिस्टिम्स लिमिटेड’ने संस्थापक अध्यक्ष भवरलालजी जैन यांचे वडील स्व. हिरालाल जैन (बाबा) यांच्या ३६ व्या स्मृतिदिनी देशभरातील विविध ठिकाणी रक्तदान शिबिरे आयोजित केली. या उपक्रमात एकूण ३१९ सहकाऱ्यांनी स्वेच्छेने रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली.
🔹 फूड पार्कमध्ये उत्साहपूर्ण सुरुवात
जळगावातील जैन फूड पार्क येथील शिबिराचे उद्घाटन वरिष्ठ सहकारी प्रदीप सांखला व सुनील गुप्ता यांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि स्व. हिरालाल जैन यांच्या प्रतिमापूजनाने झाले. यावेळी किशोर बाविस्कर, जी. आर. पाटील, राजेश आगिवाल, जी. आर. चौधरी आदी सहकारी उपस्थित होते. शिबिराची सुरुवात संजय पारख यांनी पहिले रक्तदान करून केली. त्यानंतर जी. आर. चौधरी आणि आशुतोष माळी यांनीही रक्तदान केले. ऍग्री पार्क, फूड पार्क, एनर्जी पार्क व डिव्हाईन पार्क येथील सहकाऱ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवला.
🔹 प्लास्टिक पार्कमध्येही रक्तदान शिबीर

प्लास्टिक पार्कमधील ज्ञानालय येथील शिबिराचे उद्घाटन डॉ. जनमेजय नेमाडे व राजीव सरोदे यांच्या हस्ते झाले. यावेळी सी. एस. नाईक, डॉ. ज्ञानेश पाटील, किशोर बोरसे, किशोर सोनार आदी उपस्थित होते. प्लास्टिक पार्क, टाकरखेडा टिश्युकल्चर प्लांट, जैन फूड मॉल, कांताई नेत्रालय व कांताई सभागृह येथील सहकाऱ्यांनी रक्तदान केले.
🔹 देशभरातून ३१९ बाटल्यांचे संकलन
जैन प्लास्टिक पार्कमध्ये सर्वाधिक २२४, तर फूड पार्कमध्ये ६० सहकाऱ्यांनी रक्तदान केले. याशिवाय अलवर (२), बडोदा (४), उदमलपेठ (६), हैदराबाद (१०) आणि चित्तूर (१३) येथील सहकाऱ्यांनीही सहभाग नोंदवला. सर्व केंद्रांमधून मिळून एकूण ३१९ बाटल्या रक्ताचे संकलन झाले.
🔹 तज्ज्ञ वैद्यकीय पथकांचे सहकार्य
रक्तसंकलनाची जबाबदारी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी आणि जिल्हा शासकीय रुग्णालय, जळगाव यांनी पार पाडली. या कार्यात डॉ. मकरंद वैद्य, भानुदास येवलेकर, उज्वला पाटील, जयेश पाटील, श्रीकांत मुंडे आणि रामचंद्र पोतदार यांनी परिश्रम घेतले.
🔹 दरवर्षीची परंपरा, दरवर्षीचा संकल्प
दरवर्षी स्व. हिरालाल जैन यांच्या स्मृतिदिनी हा उपक्रम राबवला जातो. या रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळण्यास मदत होते, हीच या उपक्रमाची खरी ताकद आहे.

