जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक संपन्न झाली. या बैठकीला आमदार सुरेश दामु भोळे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची विशेष उपस्थिती होती.

बैठकीत आगामी सण-उत्सवांचे आयोजन, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी करावयाचे नियोजन, तसेच नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी आवश्यक समन्वय आणि उपाययोजना याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच पोलीस अधीक्षक यांनी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नियोजनाची माहिती दिली. यावेळी आमदार भोळे यांनी नागरिकांना अडचण न होता नियमांच्या चौकटीत सण-उत्सव साजरे करण्याच्या सूचना दिल्या. याप्रसंगी बैठकीस विविध प्रशासकीय विभागांचे जिल्हास्तरीय अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

