Home » जळगाव » केळी व्यापाराबाबत जळगाव व बुरहानपूर प्रशासनाची संयुक्त बैठक

केळी व्यापाराबाबत जळगाव व बुरहानपूर प्रशासनाची संयुक्त बैठक

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज बुरहानपूर (म.प्र.) चे जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे केळी व्यापाराच्या विविध मुद्यांवर चर्चा केली.

■ लिलावात पारदर्शकता
बुरहानपूर प्रशासनाने आश्वासन दिले आहे की येत्या काही दिवसांत केळीचा लिलाव YouTube वर थेट प्रक्षेपित करण्यात येईल. तसेच सर्व APMC मंडळांना ही पद्धत स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे.
■ शेतकऱ्यांचे हितसुरक्षण
APMC बाहेरील केळी व्यापारावर सतत तपासणी करण्यात येणार असून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील.
■ किंमत ठरविण्याची नवी पद्धत
व्यापारातील “किमान दर” आता किमान २० व्यवहारांच्या सरासरीवर आधारित असेल. केवळ सर्वात कमी दर ग्राह्य धरला जाणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना अधिक न्याय्य भाव मिळेल.

■  सध्याची बाजारस्थिती
बुरहानपूर जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकरी व व्यापाऱ्यांशी बैठक घेतली. उत्तर भारतातील अनेक प्रमुख बाजारपेठांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे मागणी तात्पुरती घटली आहे. मात्र ही परिस्थिती तात्पुरती असून पाणीपातळी कमी झाल्यावर व दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात मागणीत वाढ होऊन दर स्थिर होण्याची अपेक्षा आहे. शेतकऱ्यांचे हित सुरक्षित ठेवणे, केळी व्यापार अधिक न्याय्य व पारदर्शक करणे आणि शाश्वत व्यापार प्रणाली उभारणे या उद्दिष्टाने जळगाव व बुरहानपूर प्रशासन एकत्रितरीत्या काम करत राहील.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!