Home » जळगाव » मानव सेवा विद्यालय जळगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

मानव सेवा विद्यालय जळगाव येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा

जळगाव ( वास्तव पोस्ट ) : आज ५ सप्टेंबर २०२५ रोजी मानव सेवा मंडळ जळगाव संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षक दिनानिमित्त इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी परिपाठापासून तासिका घेतल्या. विद्यार्थी शिक्षकांनी घेतलेल्या अध्यापनाचे अनुभव मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी अध्यापन वर्गाचे परीक्षण सर्व शिक्षकांनी केले. मुख्याध्यापिका, विद्यार्थी शिक्षक व शिक्षक वृंद यांनी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून सर्व शिक्षकवृंदाचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे अध्यापन केले. तसेच प्राथमिक विद्यार्थी मुख्याध्यापिका मोक्षदा सूर्यवंशी उपमुख्याध्यापक चैतन्य पाटील, माध्यमिक मुख्याध्यापिका जान्हवी चौधरी व उपमुख्यधापिका योगिनी राठोड, विद्यार्थी शिक्षक आराध्या पाटील, देवांशी चतुर, यामिनी पाटील, गुंजन जाधव, जान्हवी चौधरी, योगेश्वरी पवार, जयेश पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी विद्यार्थी शिपाई कर्मचारी उज्वल खराडे, रोहित पाटील, विकी मिस्तरी, अमोल सैंदाणे, मोक्ष पाटील, अमोल पाटील यांनी उत्कृष्ट असे काम केले.

प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून मनीषा सूर्यवंशी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस. डाकलिया, माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, प्राथमिक मुख्याध्यापिका माया अंबटकर, शिशुविभाग मुख्याध्यापिका मुक्ता पाटील, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी उपस्थित होते.

सर्वांनी विद्यार्थी शिक्षकांचे खूप खूप कौतुक केले. यावेळी सर्व शिक्षक वृंदांना संस्था अध्यक्ष मा. डॉ. आर.एस. डाकलिया, पदाधिकारी व सदस्य, पालक वर्ग तसेच विद्यार्थ्यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन काव्या पाटील व पूर्वी जयेंद्रसिंग पाटील यांनी केले तर आभार साक्षी वानखेडे व कोमल सुतार यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

error: Content is protected !!